रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते


सह्याद्री चौफेर | अनंत पाचपोहर 
      
मारेगाव : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगाव तालुक्यात सेवा पंधरवाडा कार्यक्रम दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ पर्यंत राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात रक्तदान व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते करण्यात आले. वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुभाष इंगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अर्चना देठे, भाजपचे ज्येष्ठ नेते दिनकर पावडे, विजय पिदूरकर, ता. अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवाडा उपक्रमाबाबत आमदार बोदकुरवार यांनी माहिती दिली. या आरोग्य शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. यात शुगर, बीपी, एचबी, सिकलसेल, गरोदर माता तपासणी, टीबी, कुष्ठरोग, लिव्हर, किडनी, स्त्री रोग, डेंगू , सह मलेरिया ची तपासणी केली. या शिबिराचे प्रास्ताविक डॉ.इंगळे यांनी केले.
या शिबिराकरिता इन्चार्ज सिस्टर कोवे मॅडम, डॉ.नागभीडकर सर, डॉ.अश्विन सर, डॉ.राजेश सर, डॉ.जवादे मॅडम, खामनकर सर, तावडे सर, कल्याणकर सर, रामटेके सर, जयश्री इंगोले मॅडम, प्रणाली राऊत , कायसी साखरे, रेवती गोचडे, योगिता कुकुर्डे, प्रीती कुळसंगे, भाग्यश्री सवाई, पूजा सौदे, सलामे मॅडम, नेहा मेंगेवार, माधुरी ब्राह्मणे, सुरेश लिहितकर, सागर चिंडाले, सुमित ब्राह्मणे, संतोष सारवान, अनंता पाचपोहर, राजकिरण राठोड, रंजीत मडावी, गौरकारजी, वडस्करजी आशा वर्कर, यासह आरोग्य सेवक तथा कर्मचारी परिश्रम घेतले. या सेवा पंधरवाडा कार्यक्रमाला तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते  रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे उद्घाटन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते Reviewed by सह्याद्री चौफेर on September 23, 2023 Rating: 5
Powered by Blogger.