आज पोळा आणि पिठोरी अमावस्या! जाणून घ्या पूजा पद्धत, तिथी आणि महत्त्व...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला अमावस्या असं म्हटलं जातं. आज भाद्रपद महिन्यातील श्रावण कृष्ण पक्षातील पिठोरी अमावस्या आहे. पिठोरी अमावस्याला भाद्रपद अमावस्या असंही म्हणतात.काल उत्तरा नक्षत्र प्रवेश, वाहन हत्ती सुरुवात झाली असून पिठोरी अमावस्येला 'पोळा' सण मोठ्या उत्सहात विशेषतः विदर्भात साजरा करण्याची परंपरा आहे. श्रावण महिन्यातील पोळा हा शेवटचा सण मानला जातो. 
अमावस्या तिथी
पंचांगानुसार भाद्रपद महिन्याची अमावस्या तिथी 14 सप्टेंबर 2023 ला पहाटे 4 वाजून 48 मिनिटांपासून सुरू झाली आहे. तर 15 सप्टेंबर 2023 ला सकाळी 7 वाजून 9 मिनिटापर्यंत असणार आहे. 
पिठोरी अमावस्या पूजाविधी
या अमावस्येला पिठाचेच सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात, त्यामुळेच याला पिठोरी अमावस्या असं म्हणतात. या दिवशी मातृदिन साजरा केला जातो. या दिवशी दुर्गा मातासह 64 देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केले जातात. घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्येला उपवास करतात. ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या केली जाते. अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो. याशिवाय अमावस्येला पितृदोषापासून मुक्तीसाठी उपाय केले जातात. 
पोळा सण असा साजरा करा
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विशेषतः विदर्भात "पोळा" हा सण मोठ्या उत्साहात केला जातो. सकाळी उठून घरातील बैलांना नदी नाल्यावर नेऊन त्यांना उटणे लावून त्यांची आंघोळ घालून विविध वस्त्रांनी आणि दागिन्यांनी, बेल फुलांनी सजवलं जातं. घरातील स्त्री त्या बैलांची पूजा करतात आणि पुरणपोळीच्या नैवेद्य बैलांना दिला जातो. ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीचे बैल बनवतात आणि त्याची पूजा करुन कृतज्ञता व्यक्त करतात. 

'सह्याद्री चौफेर' परिवारातर्फे पोळ्या सणाच्या सर्वांना मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा! 

आज पोळा आणि पिठोरी अमावस्या! जाणून घ्या पूजा पद्धत, तिथी आणि महत्त्व... आज पोळा आणि पिठोरी अमावस्या! जाणून घ्या पूजा पद्धत, तिथी आणि महत्त्व... Reviewed by सह्याद्री चौफेर on September 14, 2023 Rating: 5
Powered by Blogger.