सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : तालुक्यातील महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत गाव पातळीवर राबवत असलेल्या विकासकामात गैरप्रकार सुरू असून कामात अनियमितता असल्याबाबत सचिन मेश्राम यांनी राज्य शासनाच्या संकेतस्थळावर तक्रार केली होती. याची वरिष्ठ पातळीवर दखल घेऊन पंचायत समिती चे गटविकास अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे आता रोजगार हमीच्या कामाच्या अनियमिततेची बऱ्याच दिवसापासून पत्थ्य पडलेल्यांची "मारबत" निघणार आहे,असं म्हणणं काही वावगं नाही.
महाराष्ट्र रोजगार हमी योजना ची सुरुवात "ग्रामीण भागातील उपजीविकेची सुरक्षा वाढवणे आणि प्रत्येक घरातील प्रौढ सदस्यांना आर्थिक वर्षात किमान १०० दिवसांचा हमी मजुरीचा रोजगार उपलब्ध करून देणे" या उद्देशाने सुरू करण्यात आले. मात्र, या मनुष्यबळ योजनेला ठेकेदार संबंधित विभाग बघल देत, आपलंच हित जोपासत असल्याची तक्रार प्रहार ग्राहक संघटनेच्या वतीने संकेतस्थळावरून करण्यात आली होती.
मारेगाव तालुक्यातील रोजगार हमी योजने अंतर्गंत सुरू असलेल्या कामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचे आरोप करण्यात आला आहे. कामामध्ये अनियमितता तसेच मशिनव्दारे कामे सुरू असून याची चौकशी करण्यात यावी यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रहार ग्राहक संघटनेने तक्रार केली होती. यामध्ये पंचायत समिती मारेगाव अंतर्गत मनरेगा योजनेअंतर्गत सन २०२२ - २०२३ या वर्षात सुरू असलेल्या कामांमध्ये अनियमितता तसेच मजुराऐवजी मशिनव्दारे कामे सुरू आहेत. मजुर कामावर हजर नसताना त्यांची उपस्थिती दाखवून मजुरी पत्रके काढणे, काही ठिकाणी कामे झाली नसताना सुध्दा मजुरांची उपस्थिती दाखवून बोगस मुल्यांकन करून कामाचे रकमा काढल्या जात असून हे वरिष्ठांच्या मर्जीनुसार केल्या जात असल्याचे दिसून येते. असे तक्रारकर्ते प्रहार ग्राहक संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन मेश्राम यांनी संकेतस्थळावर तक्रारीत म्हटले आहे, तालुक्यात कोणत्याच ठिकाणी कामे मजुरांच्या हातून करण्यात आले नाहीत. विभाग प्रमुखांनी आपल्या मर्जीत लोकांना हाताशी धरून ही कामे केली आहेत. मजूर दाखवून त्यांचे बिले काढून नियमांचे उल्लंघन केले असल्याचा आरोपही केला होता. तालुक्यातील करणवाडी, मांगरूळ, किन्हाळा, दापोरा, म्हैसदोडका, सगनापूर इत्यादी, गावामध्ये कामे जोमात आहे, त्यामुळे या सर्व कामाची चौकशी आता होणार असून तसा आदेश बिडीओनी दिला आहे.
त्यामुळे या रोजगार हमीच्या सर्व कार्यप्रणालीणावर बडगा उगारला जाणार असून रोजगार हमीच्या कामाच्या अनियमिततेची आता "मारबत" निघणार का? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
रोजगार हमीच्या कामाच्या अनियमिततेची निघणार "मारबत"
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 14, 2023
Rating:
