सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : कोसारा रेतीघाट कंत्राटदारास बंदुकीच्या धाकावर पाच लाख रुपयाची व दोन लाख रुपये मासिक हफ्ता खंडणी मागितल्याची तक्रार मारेगाव पोलीस स्टेशनला प्राप्त झाली असून मारेगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत आज गुरुवारला सकाळी ललित उर्फ लल्या अरुण गजभिये यास अटक करण्यात आली आहे.
मारेगाव तालुक्यात सन 2022-23 या कालावधी करीता मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील वर्धा नदीच्या रेती घाटाच सैय्यद मन्सुर सैय्यद दाऊद हे बिलाल ट्रेडर्स या नावाने घेतले आहेत. दि. 30/08/2023 रोजी सैय्यद मन्सूर यांचा मित्र हे कोसारा येथील रेती डेपोवर काम करणारा नामे विकास झंजाळ याचा मोबाईल वर ललीत उर्फ लल्ला अरुन गजभीये रा. विदर्भ हाऊसींग सोसायटी याने त्याचा मोबाईल क्रमांकवरुन फोन करून विकास याला म्हटले की, "मन्सुरचा भाऊ कादर माझा फोन उचलत नाही आहे मला त्याच्या कडुन रेती घाटाचा हफ्ता घ्यायचा आहे, जर त्याने मला पाच लाख रुपये दिले नाही तर मी त्याची जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे व आपले सरकार पोर्टलवर तक्रार करील" असा माझा निरोप कादर याला देण्यास सांगितले तसा निरोप सैय्यद मन्सूर यांना विकास याने सांगीतला. सदर कोसारा घाट नियमाप्रमाणे चालवित असल्याने त्याच्या सदर मागणीकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले. नंतर पुन्हा दिनांक 31ऑगस्टला लल्लाच्या वणी येथील सहकाऱ्याने मा. जिल्हाधीकारी यवतमाळ यांच्या कडे रेतीघाटावर रेतीचा अवैध उपसा सुरु असल्याची तक्रार दिली व आपले सरकार पोर्टलवर सुद्धा तक्रार अर्ज सादर केल्याचे माहीत पडले त्यानंतर महसूल विभागाच्या धाडसत्रात हाती काहीच लागले नाही. त्यानंतर दिनांक 12/09/2023 रोजी नामे ललीत उर्फ लल्या अरुण गजभीये याने मा. जिल्हाधीकारी यवतमाळ यांच्या कडे कोसारा येथील रेती डेपो बंद करण्यात यावा व त्यावर कार्यवाही करण्यात यावी असा लेखी तक्रार अर्ज दिला. त्यानंतर दिनांक 13 सप्टेंबरला सायंकाळी 7.30 वाजता कोसारा रेती डेपोवर आरीफ अहेमद सिद्दीक अहेमद, नुर अहेमद, विकास झंजाळ, व सुपरवाईजर शादाब पठाण हे हजर असतांना रेतीडेपो पासुन काही अंतरावर असलेल्या रोडवरील निंबाच्या झाडाजवळ उभे राहुन घाट संबधाने चर्चा करीत असतांना तेथे एक पाढ-या रंगाची आय-20 कार येवुन उभी राहली व त्यातुन नामे ललीत उर्फ लल्या गजभीये व एक अनोळखी व्यक्ती सोबत येऊन ललीत गजभीये याने तक्रारकरून सुद्धा रेतीघाटाचा हफ्ता दिला नाही म्हणून अश्लील शिवीगाळ करून बंदूक डोक्याला लावली व त्याच्या अनोळखी असलेल्या साथीदाराने चाकू पोटाला लावला. तेव्हा घाबरलेल्या राजु व शादाब यांना वाचवा म्हणून ओरडून आवाज दिला तेथे हजर असलेले सर्व लोक त्यांच्याकडे आले, तेव्हा ललीत उर्फ लल्ला याने त्यांच्या डोक्याला त्याच्या जवळील बंदुक लावलेलीच होती तेव्हा लल्ला याने माझ्या दिवानजी व सुपरवाईजर यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात करून मर्डर करण्याची धमकी दिली व आताच पाच लाख व दोन लाख रुपये महिन्याचा हप्ता देण्यास सांगितले. परंतु तेथे त्यांच्या रेती डोपोवर काम करणारे लोक आल्याने व त्यांची संख्या जास्त झाल्याने व माझा दिवानजी राजु व सुपरवाईजर नामे शादाब यांनी ललीत उर्फ लल्ला याला मला सोडण्याची विनंती करून तुझा हप्ता देण्यात येईल असे सांगितले तेव्हा लल्लाने बंदुक माझ्या काना जवळुन काढुन घेत त्याच्या साथीदारांसह त्याठिकाणावरुन निघुन गेला. अशी तक्रार मारेगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली.
या तक्रारीवरून ललीत उर्फ लल्या अरुण गजभीये (वय 33) वर्ष रा विदर्भ हाऊसींग सोसायटी यवतमाळ जिल्हा यवतमाळ व अनोळखी व्यक्ती विरुद्ध कलम 307,384,386,34 भादवी सहकलम 3.25 आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारला सकाळी यवतमाळ येथून अटक करण्यात आली असून पुढील कारवाई मारेगाव पोलीस करीत आहे.
बंदूकीच्या धाकावर मागितली पाच लाखाची खंडणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 14, 2023
Rating:
