सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन या पिकांवर पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव वाढला असून संपूर्ण सोयाबीन पिवळे पडून सुकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लावलेला खर्च निघेल की नाही अशी चिंता लागली आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून भरीव मदत देण्यात अशी मागणी भा यु मो जिल्हा सचिव तथा आत्मा समिती चे अध्यक्ष प्रसाद ढवस यांच्या नेतृत्वात आमदार बोदकुरवार यांना करण्यात आले आहे.
सदर निवेदनाची दखल घेऊन दोन ते तीन दिवसात तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी आग्रही विनंती सह मागणी करण्यात आली, यावेळी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, संचालक, अविनाश लांबट, उपसरपंच प्रशांत भंडारी, पवन ढवस, आशिष खंडाळकर, आदींची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांना यलो मोझॅकच्या नुकसानीची भरपाई द्या - युवा मोर्चाची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 30, 2023
Rating:
