रांगणा येथे अमृत कलश यात्रा...


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : 'माझी माती माझा देश' अभियान अंतर्गत देशभरात अमृत कलश कार्यक्रम साजरा होत असताना रांगणा ग्रामपंचायत व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने आज दि.30 सप्टेंबर 2023 रोजी अमृत कलश यात्रा कार्यक्रम संपन्न झाला.
    
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपूर्ण गावामध्ये विद्यार्थी युवक व गावकऱ्यांची अमृत कलश घेऊन मिरवणूक काढण्यात आली तसेच धान्य व माती गोळा करण्यात आली. तसेच सार्वजनिक पटांगणावर स्वच्छतेबाबत शपथ घेण्यात आली. यावेळी सरपंच प्रकाश बोबडे यांनी उपास्थिताना स्वच्छतेबाबत व विविध प्रश्नावर मार्गदर्शन केले.
     
यावेळी गावातील सरपंच मा. प्रकाश बोबडे, उपसरपंच अ‍ॅड.दिलीप परचाके, शाळा समितीचे अध्यक्ष राजेश वांढरे, रामनाथ जरीले, रविकांत वांढरे, विजय दुर्गे, प्रशांत खिरटकार, अमृत खिरटकर, उमेश खापणे सर, दिवाकर वांढरे, गुणवंत वांढरे, राकेश बोधाणे, प्रकाश बोढे, शंकर बदकी, राजू शिवरकर, अरुण परचाके, प्रकाश बदकी, लक्ष्मण वांढरे, सिमा लोडे, मनीषा कुळमेथे, गीतांजली अतकरे मॅडम, अं.से.चंदे मॅडम व विध्यार्थी-विध्यार्थीनी व मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते. या प्रसंगी विध्यार्ध्याना खाऊ वाटप करून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश खापणे सर, यांनी केले. तर आभार प्रदर्शन शरद गोंडे सर,यांनी केले.
रांगणा येथे अमृत कलश यात्रा...  रांगणा येथे अमृत कलश यात्रा... Reviewed by सह्याद्री चौफेर on September 30, 2023 Rating: 5
Powered by Blogger.