माधव नगरातील घरफोडीच्या आरोपीना तात्काळ अटक करण्याची केली स्थानिकांनी मागणी


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : 14 सप्टेंबरला मारेगाव शहरातील माधव नगरी येथे चोरट्यानी घरे फोडली होती. या प्रकरणाला 15 दिवस लोटून गेले, तरी अजून एकाही चोरट्याला अटक झालेली नाही. त्यामुळे या माधव नगरातील स्थानिकांनी मारेगाव येथील ठाणेदारांची भेट घेत चोरट्याना तत्काळ अटक करण्याची जोरदार मागणी केली.
       
शहरात दि.14 सप्टेंबरला धाडसी चोऱ्या झाल्या. एकाच रात्री तब्बल 17 घरे फोडत धाडसी चोरी झाली. ही जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि अद्भुत घटना होती. यात एकट्या माधव नगरातील तब्बल 10 घरे होती. यावेळी नागरिकांनी चोरीची रीतसर तक्रार दाखल केली होती. परंतु या घटनेला 15 दिवस लोटून गेली. मात्र अजूनपर्यंत चोरीचा कसलाही मागमूस न लागल्याने माधव नगरातील नागरिकांनी पोलीस स्टेशनवर धडक देत पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांची भेट घेत त्यांच्याकडून घटनेच्या प्रगतीविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी माधव नगर परिसरातील अनेक नागरिक ठाण्यावर धडकले होते.

निवेदन देताना हेमराज कळंबे, अनिता हेमराज कळंबे, विजय झाडे, नंदिनी झाडे, सुरेश आत्राम, सौ. दुर्गा आत्राम, मंगेश गवळी, सौ. सुचित्रा गवळी, सुंदरलाल आत्राम, सौ.रंजना सुंदरलाल आत्राम, संतोष ठाकरे, सौ. नंदा संतोष ठाकरे, सौ. सुनंदा राजु कोळेकर, राजु कोळेकर, बाबू काकडे, सौ प्रांजली बाळू काकडे,सुनिल भोयर, सौ. रंजना सुनिल भोयर, श्री. राजु तुकाराम डवरे, सौ संगिता राजु डवरे, प्रविण बदकी, चंद्रशेखर बोकडे, सौ उज्वला बोकडे, दिपक उरकुडे, गणेश कनाके, सौ रेखा गणेश कनाके, यासह असंख्य रहिवाशांची उपस्थिती होती. 


या प्रकरणातील चार संशयितांची नावे व नंबर वरिष्ठाना पाठवण्यात आली आहे, स्थानिकांनी फेरीवाल्याकडून सामान, वस्तू खरेदी करू नये, बाजारात जाऊन खरेदी करावे. काही संशय आल्यास पोलिसांना संपर्क साधावा.

-जनार्धन खंडेराव
ठाणेदार पोलीस स्टेशन,मारेगाव
माधव नगरातील घरफोडीच्या आरोपीना तात्काळ अटक करण्याची केली स्थानिकांनी मागणी माधव नगरातील घरफोडीच्या आरोपीना तात्काळ अटक करण्याची केली स्थानिकांनी मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on September 30, 2023 Rating: 5
Powered by Blogger.