सह्याद्री चौफेर | नंदकुमार मस्के
महागांव : तालुक्यातील कासारबेहळ येथे हनुमान मंदिरात शिव महापुराण कथाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण वातावरण शिवमय गजराने दुमदुमून गेले. अशा भक्तिमय वातावरणात हा कथा पारायण कार्यक्रम संपन्न झाला.
शिव कथा समारोपप्रसंगी हभप उत्तमराव महाराज यांच्या मधुरवाणी तून शिव कथेचा महिमा भक्तांपर्यंत पोहोचवला.
कासारबेहळ येथे महिना भर चाललेल्या शिव महापुराण कथेचा काल शुक्रवार दि. 29 सप्टेंबर ला महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता, गावातील महिला पुरुषांच्या उपस्थितीत गावातील मुख्य मार्गाने ग्रंथ दिंडी काढण्यात आली व कथेची सांगता झाली. त्यानंतर महाप्रसादाचा लाभ गावातील सर्व भाविक भक्तांनी घेतला.
या कार्यक्रमाला अविनाश करे, अशोक पाटील, येसाजी पाटे, ज्ञानदेव मोहटे, नामदेव ठाकरे, भगवानराव करे, श्रावण लोंढे, प्रकाश कवाने, गजानन करे, यांच्या सह असंख्य भाविक उपस्थित होते.
कासारबेहळ येथे शिव महापुराण कथा संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 30, 2023
Rating:
