चायला घरात भला मोठा अजगर, सर्पमित्र आले धावून

सह्याद्री चौफेर | राजू डावे

वणी : तालुक्यातील उकणी येथे एका घरी भला मोठा अजगर असल्याचे निदर्शनास येताच सर्प मित्रांना बोलवून पाच मिनिटात पकडून अजगराला वनविभागाच्या उपस्थितीत सोडण्यात आले.
सर्पमित्र हरीश कापसे यांना रात्री 2 च्या सुमारास उकणी वरुण प्रवीण पचारे यांनी संपर्क साधून घरात मोठा अजगर साप दिसत आहे अशी माहिती दिली. तातडीने उकणी येथील सर्पमित्र सुरज पारशिवे व हरीश कापसे टीम यांनी पचारे यांच्या घरातील अजगराला पाच मिनिटात सुरक्षित पकडले व वनविभागाच्या उपस्थितीत सुरक्षितपणे सोडण्यात आले.
यावेळी सर्पमित्र टीम गणेश चौधरी, धनराज मतिरे, स्वप्नील गोवरदीपे, अभय मोडक, प्रफुल पिंपळशेडे, यांचे पचारे परिवारानी आभार मानत त्यांचे कौतुकही केले. 
चायला घरात भला मोठा अजगर, सर्पमित्र आले धावून चायला घरात भला मोठा अजगर, सर्पमित्र आले धावून Reviewed by सह्याद्री चौफेर on September 30, 2023 Rating: 5
Powered by Blogger.