तलाठी भरतीत डबल परिक्षा शुल्क जमा झाल्यास शुल्क परत मिळवण्यासाठी यादीतील उमेदवारांनी असा करावा अर्ज !

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती बाबतची जाहिरात क्र. ४५/२०२३ दि. २६/०६/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर परिक्षेकरिता एकुण १०,४१,७१३ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत.

काही उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज सादर करताना दोन किंवा अधिक वेळा परिक्षा शुल्क जमा करणेत आलेले आहे. डबल परिक्षा शुल्क जमा केलेल्या उमेदवारांपेकी २३,३७९ उमेदवारांचे परिक्षा शुल्क हे परत करण्यात आलेले आहे. परंतू १,२१९ उमेदवार यांचे नाव व बैंक खात्यावरील नाव हे विसंगत होत असल्याने अद्यापपर्यंत त्यांचे दुबार झालेले परिक्षा शुल्क उमेदवारांना परत करता आले नाही. 
तरी ज्या उमेदवारांना दुबार परिक्षा शुल्क परत करणेचे आहे त्यांची यादी या सोबत जोडली असून यादीतील उमेदवार यांनी खालीलप्रमाणे तपशिल talathi.recruitment2023@gmail.com या ई- मेल आयडीवर तातडीने सादर करावा.

१.उमेदवारांचे नाव
२.बँकेचे नाव :        
३.बँक खाते क्र.       
४.बँकेचा IFSC Code
५.रजिस्ट्रेशन नं. (तलाठी अर्ज नोंदणी क्रमांक) 
६.मोबाईल नं. 
७.ई-मेल आयडी


तलाठी भरतीत डबल परिक्षा शुल्क जमा झाल्यास शुल्क परत मिळवण्यासाठी यादीतील उमेदवारांनी असा करावा अर्ज ! तलाठी भरतीत डबल परिक्षा शुल्क जमा झाल्यास शुल्क परत मिळवण्यासाठी यादीतील उमेदवारांनी असा करावा अर्ज ! Reviewed by सह्याद्री चौफेर on September 26, 2023 Rating: 5
Powered by Blogger.