आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचं काम लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या कार्यकाळात झालं, व होतही आहे. विकासात्मक धोरण जोपासून वणी विधानसभा क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देणारा त्यांचा कार्यकाळ राहिला आहे. विकसनशील व जनहितार्थ कामे हाती घेऊन त्यांनी ती पूर्णत्वास आणली. शहराबरोबरच ग्रामीण भागाच्या विकासालाही त्यांनी तेवढीच प्राथमिकता दिली. असे विकासासाठी झटणारे कर्तव्यदक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार. आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्यावर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव सह विविध माध्यमातून त्यांना उदंड आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देण्यात आल्या. विशेष म्हणजे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वणी विधानसभा क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. शारीरिक व्याधी व गंभीर आजारांचं निदान लागावं म्हणून मोफत आरोग्य तपासणी शिबिरं घेण्यात आली. 
रक्ताची वाढती गरज लक्षात घेता रक्तपेढीत रक्ताचा मुबलक साठा उपलब्ध रहावा, हा दृष्टिकोन जोपासून आमदारांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार 25 सप्टेंबरला भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. स्थानिक बाजोरिया लॉन येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिरात जवळपास दोनशे रक्तदात्यांनी रक्तदान केले. डॉ. हेडगेवार रक्तपेढी नागपूर यांनी रक्त संकलनाची जबाबदारी पार पाडली. यावेळी रक्तदात्यांनीही उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं. रक्तदात्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व एक मोठी बॅग भेट स्वरूपात देण्यात आली. रक्तदात्यांना देण्यात आलेल्या बॅगवर 55 हा दोन पंचवार्षिक विजयाच्या यशस्वी वाटचालीचा कार्यकाळ अंक स्वरूपात ठळकपणे दिसत होता. या शिबिरादरम्यान पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. 
यावेळी आमदार बोदकुरवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या सेवा पंधरवाडा कार्यक्रमा अंतर्गत राबविण्यात आलेल्या शिबिराच्या यशस्वीतेकरिता भाजपच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. यात भाजपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले. 
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव  आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव Reviewed by सह्याद्री चौफेर on September 26, 2023 Rating: 5
Powered by Blogger.