अंमलदार अनुराधा वासाडेंच्या समयसूचकतेने आगीवर नियंत्रण

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : साई मंदिर चौकात एका चायनीज स्टॉल ला अचानक आग लागली. त्या स्टॉल ला लागलेले अन्य दुकान आगीच्या कवेत येऊ नये, याठीकाणी कर्तव्यावर असलेल्या स्वतः प्रयत्न करणाऱ्या वाहतूक अंमलदार यांच्या समयसूचकतेने पुढील अनर्थ टळला. क्षणाचाही विलंब न लावता अगीवर नियंत्रण मिळविले. ही घटना दिं.26 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

शहरातील साई चौकात वाहतूक नियंत्रण उपशाखा वणी येथील वाहतूक नियमन करणे करिता कर्तव्यावर असलेल्या वाहतूक अंमलदार मपोशी अनुराधा वासाडे (ब.नं. 477) ह्या आपले कर्तव्य बजावत होत्या, अशातच येथील एका चायनीजच्या स्टॉलला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. सदर स्टॉल च्या आजूबाजूला 2 बँक, साई मंदिर, हॉटेल, जैताई मंदिर व इतर छोटे-मोठे भरपूर दुकाने व गजबजला परिसर असल्याने सदर आगीने रौद्र रूप धारण केले असते तर, आजूबाजूच्या दुकानाची हानी होऊन मोठे नुकसान झाले असते. अंमलदार अनुराधा वासाडे ह्यानी तत्काळ धैर्य दाखवून बाजूलाच असलेल्या स्टेट बँकेतील उपलब्ध अग्निशामक यंत्रच्या सहाय्याने त्या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविले.  

दरम्यान,स्टॉल दुकानदाराच्या हाताला किरकोळ इजा झाली. यात, स्टॉल संपूर्ण जळाले. परंतु मपोशी अनुराधा वासाडे यांनी आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. तीने दाखवलेल्या समयसूचकता व धैर्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. 
अंमलदार अनुराधा वासाडेंच्या समयसूचकतेने आगीवर नियंत्रण अंमलदार अनुराधा वासाडेंच्या समयसूचकतेने आगीवर नियंत्रण Reviewed by सह्याद्री चौफेर on September 28, 2023 Rating: 5
Powered by Blogger.