दुकानात पाट्या मराठीत लावा ; सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांच्याकडून स्वागत

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील व्यापाऱ्यांना दोन महिन्यांत दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले. या आदेशाचे वणी विधानसभा क्षेत्रात मनसैनिकांच्या वतीने जल्लोष करण्यात आला. त्या आदेशाचे स्वागत व कोर्टाचे आभार मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांनी प्रसिद्धी पत्रकातून मानले आहे.
गेल्या वर्षी राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावण्याचे आदेश जारी केले होते. त्यास फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने न्यायालयात आव्हान दिले होते. दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत असाव्यात हा आदेश अतार्किक आहे. राज्य सरकार भाषेच्या बाबत दुकानदारांवर मोठ्या आर्थिक भुर्दडाची सक्ती लादू शकत नाही, असा युक्तिवाद याचिकादारांनी केला होता.
या निकालाविरुद्ध व्यापारी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी करताना मराठी पाट्या लावण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देताना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी डिसेंबरपर्यंत स्थगित केली. आता दसरा, दिवाळीपूर्वी दुकानांवर मराठी नामोल्लेख असलेल्या पाट्या लावून व्यावसायिक उलाढाल वाढविण्याची हीच वेळ आहे, असा सल्ला देत सुप्रीम कोर्टाने व्यापाऱ्यांना मराठी पाट्या लावण्याचा सोमवारी सुनावणीवेळी न्यायालयाने व्यापाऱ्यांना फटकारत आदेश दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करून आभार व्यक्त केले. सर्व व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे पालन करून सहकार्य करावे असे ते 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना सांगितले.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या ऐतिहासिक लढ्याला यश मिळाल्याने राज्यासह यवतमाळ जिल्ह्यात मनसैनिकाकडून ठिकठिकाणी आनंद साजरा होत आहे.
दुकानात पाट्या मराठीत लावा ; सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांच्याकडून स्वागत दुकानात पाट्या मराठीत लावा ; सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांच्याकडून स्वागत Reviewed by सह्याद्री चौफेर on September 28, 2023 Rating: 5
Powered by Blogger.