सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 17 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवाडा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने पं. दीनदयाल उपाध्याय व वणी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 25 सप्टेंबरला वणी येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील बाजोरिया हॉल मध्ये दि. 25 सप्टेंबरला सकाळी 10 वाजतापासून या शिबिराची सुरुवात होणार आहे. दुपारी 4 वाजे पर्यंत रक्तदान शिबिर चालणार आहे. त्यासोबत या ठिकाणी पं. दीनदयाल उपाध्याय यांची जयंती सुद्धा साजरी करण्यात येणार आहे.
दि. 25 सप्टेंबरलाच प्राथमिक आरोग्य केंद्र कायर येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात रक्तातील साखर तपासणी, रक्तदाब, हिमोग्लोबिन तपासणी, सिकलसेल तपासणी, गरोदर माता तपासणी, टी. बी.,कुष्ठरोग तपासणी, लिव्हर, किडनी, कॅन्सर तपासणी, डेंगू, मलेरिया व इतर आरोग्य तपासणी होणार आहे. दि. 29 सप्टेंबरला घोन्सा येथे गजानन महाराज देवस्थान येथे त्याच दिवशी शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबीर होणार आहे.
या संधीचा वणी विधानसभा क्षेत्रातील समस्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केली आहे.
वणीत भव्य रक्तदान व मोफत आरोग्य शिबीर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 24, 2023
Rating:
