सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : कुणबी जात प्रमाणपत्र मिळवून ओबीसीत स्थान मिळविण्याचा मार्ग मराठा समाजाने सध्या निवडला आहे. हा मार्ग हाणून पाडण्यासाठी सर्वत्र आंदोलन मोर्चा होत आहे. याच अनुषंगाने मारेगाव येथील शासकीय विश्रामगृहात आज एक बैठक घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये सर्वानुमते महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
येत्या 29 सप्टेंबर 2023 रोज शनिवारला स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दुपारी 12 वाजता 'ओबीसी' सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला तालुक्यातील सर्व पक्षीय व ओबीसी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने आज करण्यात आले आहे.
या बैठकीला माजी जिप सदस्य अनिल देरकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, किशोर सुर, विजय घोटेकर, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष आकाश बदकी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अविनाश लांबट, शिवसेना तालुका प्रमुख विशाल किन्हेकर, ग्रा.पं. लोकप्रतिनिधी दिवाकर सातपुते, संदीप आस्वले, श्रीकांत गौरकार सरपंच, भास्कर दानखेडे, उमेश उलमाले, अजय आस्वले आदींची उपस्थिती होती.
मारेगाव येथे ओबीसी संघर्ष समितीची बैठक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 25, 2023
Rating:
