होमगार्ड यांना बाप्पाच्या आरती मान

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : गणेशोत्सवामध्ये विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून गणेशोत्सव मंडळे एकात्मतेचा आणि समाज प्रबोधनाचा वारसा जपत असतात. त्यातही काही मंडळे वेगळ्या प्रकारचे अभिनव उपक्रम राबवून आपले वेगळेपण सिद्ध करताना दिसतात‌. अशाच प्रकारचे वेगळेपण बालगोपालांचा गणपती म्हणून नावाजल्या जाणाऱ्या गोरज येथील बाल गणेश उत्सव मंडळाने दाखवून दिले आहे.
सर्वसाधारणपणे गणेशोत्सवातील आरतीचा मान मंडळाचे पदाधिकारी, मान्यवर लोकप्रतिनिधी अथवा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते करण्याची गणेशोत्सव मंडळाची परंपरा असते. पण या परंपरेला छेद देत गोरज येथील बाल गणेश उत्सव मंडळाने गणेशोत्सवातील बाप्पाच्या आरतीचा बहुमान होमगार्ड नरेंद्र चिंचोलकर (एस जी 1873) या कर्मचाऱ्यांना देऊन आपले सामाजिक बांधिलकीतील वेगळेपण दाखवून दिले आहे.
गोरज येथील बाल गणेश उत्सव मंडळाने त्यांना गणपती च्या आरतीचा बहुमान देऊन त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव तर केलाच, शिवाय रक्षणप्रतिष्ठेचे मूल्य अधिक उंचावले आहे. या कृतीबद्दल बाल गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रदीप जुनगरी, सचिव साहिल कुमरे, सदस्य संकेत मेश्राम, करण काळे, छगन काळे, कार्तिक कुळसंगे, अनिकेत आत्राम यांची सर्व स्तरातून प्रशंसा करण्यात येत आहे.


होमगार्ड यांना बाप्पाच्या आरती मान होमगार्ड यांना बाप्पाच्या आरती मान Reviewed by सह्याद्री चौफेर on September 25, 2023 Rating: 5
Powered by Blogger.