मारेगाव तालुक्यातील गणेश भक्तांना महाप्रसादचा लाभ घेण्याचे अष्टविनायक मंडळाचे आवाहन

सह्याद्री चौफेर | अनंत पाचपोहर 

मारेगाव : तालुक्यातील चिंचमंडळ येथील अष्टविनायक गणेश मंडळाला तब्बल 26 वर्षाची परंपरा आहे ..!
तब्बल दहा दिवस चालणाऱ्या या गणेश उत्सवाचा गुरुवारी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या महाप्रसादाचा लाभ मारेगाव तालुक्यातील सर्व गणेश भक्तांनी घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. 
"एक गाव एक गणपती" म्हणून अष्टविनायक गणेश मंडळ चिंचमंडळ येथे गेल्या 26 वर्षांपासून नवयुवक मंडळी गणेश स्थापना करतात. या मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जातात, यंदाही अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ, चिंचमंडळ द्वारा कार्यक्रम करण्यात आले. विशेष उल्लेखनीय की, यंदा विदर्भातील प्रसिद्ध बँजो बँड पार्टी 'नगमा धुमाल' असणार आहे. त्यामुळे महाप्रसाद कार्यक्रम सह गणेश विसर्जनाला परिसरातील गणेश भक्तांनी उपस्थिती दर्शवावी असे, मंडळाचे अध्यक्ष अनिकेत यांनी आवाहन केले आहे. 
गुरुवार दि.28 सप्टेंबर सायंकाळी गणेश आरती नंतर लगेचच महाप्रसादाला सुरुवात होणार असून आगमनापर्यंत असणार आहे. तसेच शुक्रवार दि. 29 संप्टेंबर ला दुपारी 3 ते रात्री दहा पर्यंत गणेश विसर्जनाचा कार्यक्रम असल्याचे अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाचे अनिकेत झाडे (अध्यक्ष), सदस्य अतुल पचारे, वैभव सोनटक्के, शैलेश कवाडे, गणेश शिरसगर, शुभम पालकर, वासू विखणकर, सुहास दानव, संजय मांढरे, विकास दानव, पदाधिकाऱ्यांनी "सह्याद्री चौफेर" माहिती दिली. 
मारेगाव तालुक्यातील गणेश भक्तांना महाप्रसादचा लाभ घेण्याचे अष्टविनायक मंडळाचे आवाहन मारेगाव तालुक्यातील गणेश भक्तांना महाप्रसादचा लाभ घेण्याचे अष्टविनायक मंडळाचे आवाहन Reviewed by सह्याद्री चौफेर on September 25, 2023 Rating: 5
Powered by Blogger.