एसीबी च्या जाळ्यात मंडळ अधिकारी अडकला


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था

राळेगाव : यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील नगर परिषद कार्यालयातील घटना ताजी असतानाच जिल्ह्यातील राळेगाव येथे नवीन घटना घडली. आरोपी लोकसेवक शिशीर एकनाथ निनावे, पद मंडळ अधिकारी राळेगांव, नेमणुक तहसिल कार्यालय राळेगांव जिल्हा यवतमाळ (वर्ग-३) यांनी दिनांक ०८ ऑगस्ट २०२३ रोजी पडताळणी कार्यवाही दरम्यान पंचासमक्ष तक्रारदार यांना त्यांचे बहिणीच्या नावे शेतीचा फेरफार करुन देण्यासाठी तडजोडीअंती ३,०००/- रूपये लाचेची मागणी केली व आज दिनांक ०८ ऑगस्ट मंगळवार रोजी सापळा रचून कार्यवाही दरम्यान पंचासमक्ष लाच रक्कम एम.एस.ई.बी. कार्यालय राळेगाव समोर स्विकारली असता लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे विरूद्ध पोलीस स्टेशन राळेगांव येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असुन पुढील तपास चालू आहे.

सदरची कार्यवाही मा श्री मारूती जगताप, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, श्री देविदास घेवारे, अपर पोलीस अधीक्षक, अमरावती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्री. उत्तम व्हि.नामवाडे आणि अंमलदार निलेश पखाले, जयंत ब्राम्हणकर, अतुल मत्ते, सचिन भोयर, राहुल गेडाम, राकेश सावसाकडे, सुरज मेश्राम व चालक श्रेणी पोउपनि संजय कांबळे सर्व नेमणुक अॅन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ यांनी केली.

शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो यवतमाळ कार्यालयास मोबाईल क्रमांक ७७२२००२५५५, दुरध्वनी क्रमांक ०७२३२-२४४००२ तसेच टोल फि कमांक १०६४ वर संपर्क करण्याचे आव्हान पोलीस उप अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, यवतमाळ यांनी केले आहे.