सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : येथील शेतकरी सुविधा केंद्रात कृषि विभाग पं.स.मारेगांव मार्फत फवारणी करताना घ्यावयाची काळजी बाबत शेतकरी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामस्तरीय कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणात श्री.संदिप वाघमारे कृषि अधिकारी (सा.) यांनी किटकनाशकांची तिव्रतेनुसार कशी निवड करायची? फवारणी करताना सुरक्षेच्या दृष्टीने फवारणी सुरक्षा किटचा वापर करण्याबातचे प्रात्यक्षिक दाखवले आणि फवारणी करताना खर्रा,बिडी व तंबाखु यांचे सेवन टाळावे अशी सुचना केली.तसेच ग्रामसेवक व सरपंच यांनी ग्रामस्तरावर फवारणी करताना घ्यावयाची काळजी बाबत व्यापक प्रचार व प्रसिध्दी करावी असे आव्हान करण्यात आले.
सदर प्रशिक्षणास श्री.पि.एम.मडावी गटविकास अधिकारी पं.स.मारेगांव,श्री.डी.टी.मुनेश्वर विस्तार अधिकारी पंचायत, श्री.डी.सुधाकर जाधव विस्तारअधिकारी (सां), सौ.तुरकर, सौ.वाकडे यशदा प्रशिक्षक यांचेसह तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.