मारेगाव : सध्या तालुक्यात डोळ्यांची साथ सुरु आहे. याची संख्या दिवासेंदिवस खूप वाढलेली दिसत असून यांचा नाहक त्रास जनतेला सोसावा लागत आहे. त्यामुळं सामाजिक जाणीवेतून तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने मारेगाव तालुक्यात डोळ्यांचा साथ रोग शिबीर आयोजित केले आहे.
आज दि.8 ऑगस्ट रोजी मारेगाव येथील नगर पंचायत च्या मंचावर हे शिबीर आयोजन करण्यात आले होते, या शिबिराचा असंख्य जनतेनी लाभ घेतला असून रंगनाथ स्वामी पतसंस्था संचालक, माजी वसंत जिंनिंग संचालक, माजी गटनेता नगर पंचायत, धम्म राजिका बुद्ध विहार कमिटी अध्यक्ष, लॉर्ड बुध्दा शेतकरी गट अध्यक्ष, तथा सामाजिक कार्यकर्ते मा.उदय रायपुरे यांनी सुद्धा या शिबिरात सहभागी होऊन सदर शिबिराचा लाभ घेतला. तसेच उद्या बुधवार दि.9 ऑगस्ट रोजी मार्डी येथे होणाऱ्या शिबिराचा लाभ जनतेनी घ्यावा असे, आवाहन देखील श्री रायपुरे यांनी "सह्याद्री चौफेर" च्या माध्यमातून केले आहे.