डोळ्यांचे साथरोग नियंत्रण शिबिर, काँग्रेस कमिटीचा उपक्रम



सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : नगर पंचायत येथील खुल्या मंचा वर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने डोळ्यांचा साथ रोग नियंत्रण शिबिर घेण्यात आले. यात 165 गरजू रुग्णांनी लाभ घेतला आहे. 

तालुक्यात डोळ्यांच्या साथ रोगाने थैमान घातला आहे. यावर आळा घालण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या पुढाकारातून आज 9 ऑगस्ट, रोजी मार्डी येथे तर नवरगावात 10 ऑगस्ट रोजी डोळ्यांचा साथ रोग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कुंभा व मारेगाव येथे पार पडलेल्या शिबिराचा परिसरातील शेकडो गरजू रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरात रुग्णांची तपासणी करुन त्यांना मोफत औषध वाटप करण्यात आले.

मारेगाव येथे पार पडलेल्या शिबिरात बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा, तालुकाध्यक्ष मारोती गौरकार, ता. यु. अध्यक्ष आकाश बदकी, श.यु.अध्यक्ष सय्यद समीर, नगरसेवक जितेंद्र नगराळे, रंगनाथ स्वामीचे संचालक उदय रायपुरे, अनु. जा. ता. अध्यक्ष आकाश भेले, नगराध्यक्ष डॉ मनिष मस्की आदीसह काँग्रेस चे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.