टॉप बातम्या

पोषण आहार सप्ताहामध्ये सहभाग नोंदविण्याचे अधिक्षिका बरडे यांचे आवाहन

सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे 

वरोरा : उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पोषण आहार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या ७ दिवसांमध्ये पोषण आहार विषयी वेगवेगळ्या पाककृती स्पर्धा, आरोग्य शिक्षण स्पर्धा, स्लोगन स्पर्धा, कविता स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, इत्यादी पोषण आहार विषयांवर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर पुर्ण सप्ताहात बचतगट आरोग्य सेविका, आशावर्कर, वेगवेगळ्या संस्था, संघटना यांना सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अधीसेविका वंदना बरडे उपजिल्हा रुग्णालय वरोरा या नं. ९९२२०१३२४३ संपर्क करावा. या कार्यक्रमात डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक जनरल सर्जन, अधीसेविका वंदना बरडे, आहारतज्ज्ञ गीतांजली ढोक, समुपदेशक वंदना बुर्रेवार, यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी यांत सहभाग नोंदवावा असे, आवाहन आयोजिका वंदना बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांनी केले आहे.
Previous Post Next Post