सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात येणारी तलाठी भरतीची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. ही तलाठी भरती 4644 जागांसाठी होणार आहे. यासाठी तब्बल 13 लाख अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता अभ्यास कसा करावा? अभ्यास करताना कोणत्या विषयावर भर द्यावा? तसेच पेपर सोडवताना काय काळजी घ्यावी याबद्दलच महाराष्ट्र राज्य प्रमाण लेखन निश्चिती समिती सदस्य बाळासाहेब शिंदे यांनी माहिती दिली आहे.
अशी करा परीक्षेची तयारी..!
तलाठी भरती परीक्षेला दिवस कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आता नोट्स न काढता वाचनावर जास्त भर द्यावा. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी होक्याब्लरीवर जास्त भर द्यावा. यामध्ये ग्रामर शब्दसंग्रह, शुद्ध-अशुद्ध शब्द यांचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा.
विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम TCS, IBPS आणि MPSC यांच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवाव्यात यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
या क्रमाने सोडवा पेपर..
परीक्षा पेपर कॉम्युटरवर असल्यामुळे आपल्याकडून काही गडबड होवू नये म्हणून पेपरच्या आधी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका आपण कॉम्युटरवरती किंवा लॅपटॉपवरती सोडवण्याचा प्रयत्न करावा. पेपर सोडवताना सर्वप्रथम मराठीचे प्रश्न सोडवावे. त्यानंतर GS सोडवावे नंतर इंग्रजी सोडवावे आणि सगळ्यात शेवटी बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न सोडवावे.
या क्रमाने जर तुम्ही पेपर सोडविला तर तुम्ही सगळे प्रश्न हे सोडवू शकता, असं बाळासाहेब शिंदे सांगतात. TCS पॅटर्नमध्ये जास्तीत जास्त हे बुद्धिमत्तेवरती प्रश्न आधारित असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्तेचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवावेत. त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करावा. पेपर देताना विद्यार्थ्यांनी पॉझिटिव्ह विचार मनात ठेवून पेपर द्यावा. मनात कोणती शंका न ठेवता पेपर द्यावा म्हणजे तुमचे सर्व प्रश्न हे तुम्ही सोडू शकता आणि तुमच्याकडून कोणतीही गडबड होणार नाही.
या ट्रिक्स तुम्ही पेपर देताना फॉलो करू शकता.
परीक्षेसाठी 13 लाख फॉर्म आले म्हणून विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये जे विद्यार्थी आधीपासून अभ्यास करतात त्यांचं सिलेक्शन या परीक्षेमध्ये नक्कीच होईल, असं बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.