सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील कुंभा, मारेगाव, मार्डी व नवरगाव येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने डोळ्यांचा साथ रोग नियंत्रण शिबिर सप्ताह, नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे.
तालुक्यात डोळ्यांच्या साथ रोगाने थैमान घातला आहे. यावर आळा घालण्यासाठी व जनतेच्या मागणीला मान देऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या पुढाकारातून कुंभा येथे 6 ऑगस्ट, मारेगावात 8 रोजी, मार्डी येथे 9 रोजी तर, नवरगावात 10 ऑगस्ट रोजी डोळ्यांचा साथ रोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा जनहितार्थ उपक्रम चारही ठिकाणी उत्स्फूर्तपणे पार पडलेल्या शिबिराचा परिसरातील जवळपास सातशे च्या वर गरजू रुग्णांनी लाभ घेतला.
या शिबिरात प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वप्निल गोहोकार, डॉ अनिकेत अलोणे, निशा गेडाम, प्रथम महाकुलकर, लोकेश छाजेड, विजया कांबळे यांनी रुग्णांची तपासणी करुन त्यांना मोफत औषध वाटप करण्यात आले. कुंभा,मारेगाव,मार्डी व नवरगाव येथील काँग्रेस कमिटीचे विजय घोटेकर, मारोती मत्ते, देवा गोहणे विजय बोथले, प्रभाकर घोटेकर, वरूण ठाकरे, आकाश भेले, सुमन ठाकरे, राजू महाजन, कवड अंडस्कर, पिंटू डाखरे, वनिता घोटेकर, उज्वला डाहुले, विठ्ठल डुकरे,
शाहरुख शेख, समिर कुळमेथे, युनूस शेख, रॉयल सय्यद, समीर शेख, मुरलीधर बिलबिले, शरद पावनकर, चरण वाढई, महादेव सोनुले, सरपंच रविराज चंदनखेडे, उपसरपंच सुधाकर डाहुले, गंगाधर ठावरी, राजकुमार पाटील, सुरज पंडिले, बंडू आसुटकर, नयन आसुटकर, बंडू पुनवटकर, भास्कर धांडे, अजय आसूटकर, राजकुमार पाटील, ईश्वर बोबडे, सरपंच सुचिता कुमरे, सागर लोणारे, मारोती सोमलकर, योगवश्वर गौरकार, युवराज भोसले आदींनी परिश्रम घेतले.

यावेळी बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा, तालुकाध्यक्ष मारोती गौरकार, सय्यद समिर, अंकुश माफुर, आकाश बदकी, प्रफुल्ल विखनकर, आदी उपस्थित होते.