सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : जागतिक आदिवासी दिनानिमित्त क्रांतिसुर्य बिरसा मुंडा युवासेने च्या वतीने बुधवार दिनांक 09 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 7.30 वाजता येथील बस स्थानक चौकात मणिपूर घटनेचा निषेध करत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
आदिवासी समाजाचे सांस्कृतिक वेगळेपण, मानवतेबद्दल असीम श्रद्धा, निसर्गावरील अतुलनीय प्रेम आणि अत्युच्च प्रामाणिकपणा व पारंपरिक निखळ गुणांचा गौरव म्हणून दरवर्षी जागतिक स्तरावर 09 ऑगस्ट हा ‘जागतिक आदिवासी दिन’ साजरा करण्यात येतो. हा दिवस तालुक्यातील समग्र आदिवासी समाजासाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा दिवस आहे. यावर्षी मारेगाव येथे संपूर्ण आदिवासी समाज बांधवाच्या वतीने मणिपूर, पहापळ येथील बलात्कार, जिवती तालुक्यातील मतिमंद युवती वर अतिप्रसंग,एरंडोल (जि जळगाव) येथे वसतिगृहातील मुलीवर लैंगिक शोषण, सांगली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान तोडण्यात आली अशा अनेक घटना देशातील आदिवासी समाजावर घडत आहे याचा निषेध, सरकार चा निषेध म्हणून काल आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
मच्छिन्द्रा येथे मणिपूर घटनेसह वरील नमूद सर्व घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमास गावातील आदिवासी समाज बांधव इतर मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.