मारेगावात रानभाजी महोत्सव मेळावा व तालुका स्तरीय कार्यशाळा संपन्न

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : दिनांक १२/०८/२०१३ ला तालुका कृषी कार्यालय मारेगाव यांचे वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन येथील महाविद्यालयात घेण्यात आले. रानभाजी महोत्सवाचे उदघाटन आत्मा समितीचे अध्यक्ष प्रसाद ढवस यांचे हस्ते पार पडले.
या रानभाजी महोत्सवामध्ये आंबाडी काटवल, माट, कोंबडा, चिवरी, कुंजीर, अशा भाज्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. शासनाने गेल्या वर्षापासून या पिढीकडून त्या पिढीकडे भाज्यांची ओळख व महत्व वाढावे या दृष्टीने रानभाजी महोत्सव आयोजीत करण्यात येतो. त्याचसोबत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया योजने बद्दल कार्यशाळा पार पडली.
या महोत्सवाला यवतमाळ येथील खांडवे सर व चव्हाण सर यांचे मागदर्शन लाभले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रसाद ढवस हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून वनस्पतीशास्त्राचे प्रा. चव्हाण सर तालुका कृषी आधिकारी निकालने, ता. अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, सौ डिमन टोंगे, सौ इंदू किन्हेकर, पारस्का सर इत्यादी प्रामुख्याने हजर होते. कार्यक्रमाला वनस्पतीशास्त्राचे विध्यार्थी-विद्यार्थीनी, महिला बचत गट, उमेद, च्या महिला व पुरुष, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
मारेगावात रानभाजी महोत्सव मेळावा व तालुका स्तरीय कार्यशाळा संपन्न मारेगावात रानभाजी महोत्सव मेळावा व तालुका स्तरीय कार्यशाळा संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on August 13, 2023 Rating: 5
Powered by Blogger.