ऑनलाईन शासकीय वाळू बुकिंग सुरु...लाभार्थ्यांनी तालुका सेतू सुविधा केंद्राला भेट द्या - सेतू संचालक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून राज्य शासनाने नवीन वाळू धोरण तयार केले. या धोरणानुसार घरकुल लाभार्थ्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून अवैध वाळू उपसा होण्यास प्रतिबंध होणार आहे. नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी राज्यातील जिल्हा प्रशासनाने करावी, असे निर्देश महसूल विभागाने दिले.

दिनांक 10 ऑगस्ट रोजी आमदार यांचे हस्ते शुभारंभ कोसारा घाटात पार पडला. त्यामुळे मारेगाव तालुक्यातील घराचे स्वप्न रंगवणाऱ्यांना आता त्यांचे स्वप्न पुर्ण होणार आहे. रेतीची ऑनलाईन नोंद सुरु झाली असून या संदर्भात तहसीलच्या शासकीय तालुका सेतू सुविधा केंद्रात घरकुल लाभार्थ्यांना रेती (वाळू) बुकिंगकरिता भेट द्यावी लागणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी सोबत आधार कार्ड आणि यापूर्वी रजिस्टर केलेला मोबाईल नंबर सोबत ठेवावा, जेणेकरून रेती बुकिंग करतांना तांत्रिक अडचणी येणार नाही, त्यामुळे लाभार्थ्यांच्या सोबत मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. त्याशिवाय पुढील प्रोसेस होणे शक्य नाही. 

विशेष उल्लेखनीय की, पंचायत समिती कडे घरकुल यादीत समाविष्ट असलेल्या नावांची नोंद प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांना फक्त रेती मिळणार आहे, अशी माहिती आहे. त्यामुळे नागरिकांनी ज्यांचे नाव घरकुल यादीत आले असतील, त्यांनीच लाभ मिळणार आहे. अधिक माहितीकरिता तहसील कार्यालय तालुका सेतू सुविधा केंद्राला भेट देऊन संपर्क साधावा.

ऑनलाईन शासकीय वाळू बुकिंग सुरु...लाभार्थ्यांनी तालुका सेतू सुविधा केंद्राला भेट द्या - सेतू संचालक ऑनलाईन शासकीय वाळू बुकिंग सुरु...लाभार्थ्यांनी तालुका सेतू सुविधा केंद्राला भेट द्या - सेतू संचालक Reviewed by सह्याद्री चौफेर on August 13, 2023 Rating: 5
Powered by Blogger.