वाढदिवसा प्रसंगी अंगणवाडी व जि प शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : हल्ली वाढदिवस आपण विविध प्रकारे साजरे होतांना पाहतोय, "बर्थडे आहे भावाचा" म्हणत वाटेल तेवढा खर्च करून नाव व प्रसिद्धी मिळवतो. जिकडे तिकडे बॅनर चा धुवाधार पाऊसच पाऊस...या दिनी मान्यवरांच्या हस्ते केक भरवणे, सर्वांच्या इच्छे प्रमाणे वैगेरे वैगेरे करित असतो. पण मात्र, समाजात असेही काही वाढदिवस साजरे होतात त्याची प्रसिद्धी तर सोडा, कुठलाही लवाजमा, अजिबात काहीच केल्या जात नाही. किंबहुना गाजावाजा न करता, अनावश्यक टाळून सामाजिक बांधिलकी जपत "बर्थडे" साजरे केले जातात. उदाहरणार्थ आशिष भाऊ खंडाळकर, यांचा 26 व्या वाढदिवस निमित्ताने अंगणवाडी व जि प शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून एक सामाजिक संदेश देत वाढदिवस साजरा करण्यात आला. 

भाऊंनी अगदी साध्या पद्धतीने लहान मुलांसोबत मिसळून हसत खेळत आपल्या वाढदिवसाचा अनाथायिक अनावश्यक खर्च टाळत रामेश्वर शाळेत व अंगणवाडी येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना वही पेन बॅग व इतर शाळा उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून समाजाप्रती एक आदर्श निर्माण केला आहे. आशिष खंडाळकरांचे सोशल च्या माध्यमातून या नावीन्यपूर्ण स्तुत्य उपक्रमाचे त्यांच्या मित्र परिवाराकडून कौतुकासह उदंड आयुष्याच्या अगणीत शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, गावकरी विनोद चहानकर, दिलीप खंडाळकर, संजय देवाळकर, प्रफुल पाटिल, सुमित उरकुडे, शाम उरकुडे, विशाल ताजणे व मारोती उरकुडे आदी उपस्थित होते. 
वाढदिवसा प्रसंगी अंगणवाडी व जि प शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप वाढदिवसा प्रसंगी अंगणवाडी व जि प शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप Reviewed by सह्याद्री चौफेर on August 12, 2023 Rating: 5
Powered by Blogger.