आप'च्या पदाधिकाऱ्याला रॉडने बेदम मारहाण

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : येथील एका महाविद्यालयात एमए चे शिक्षण घेणारा विद्यार्थी तथा आम आदमी पार्टीचे तालुका संयोजक निखिल ढुरके यांच्या वर स्टिल च्या रॉड'ने हल्ला चढवून चार जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना 9 ऑगस्ट रोजी दुपारी 4.30  वाजताच्या दरम्यान, शहरातील दिपक चौपाटी वर घडली.

या मारहाण प्रकरणी अखेर वणी पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. विशेष उल्लेखनीय की, या घटने मागचा सूत्रधार असलेल्या एका राजकीय पदाधिकाऱ्याचे नाव आरोपींच्या यादीत न टाकल्याने पोलीस ठाण्यात वाद निर्माण झाला असल्याचे समजते. यात मुख्य आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, असा थेट आरोप करत निखिलने गुरुवारी अमरावती येथे जाऊन पोलीस महानिरीक्षकांची भेट घेतली. अमरावती वरुन फोन धडकल्यानंतर रात्री उशिरा पोलीसात गुन्हा दाखल होण्याची हालचाली सुरु झाली होती. अखेर या प्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या राजकीय पदाधिकाऱ्या सह 6 जणांविरुद्ध भादंवी व अनुसूचित जाती जमाती कलमांन्वये विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले.

फिर्यादीच्या तक्रारी नुसार, आप'चे ता.संयोजक तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता निखिल धर्मा ढुरके (25) हा वणी येथील रंगनाथ नगर येथे राहत असून तो शहरातील एका महाविद्यालयात एमएचे शिक्षण घेत आहे. तसेच तो आम आदमी पार्टी चा तालुका संयोजक पदाधिकारी सुद्धा आहे. निखिल ढुरकेंनी 2 ते 3 महिन्याआधी शहरातील अवैधरित्या सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे, असे निवेदन दिले होते. 

9 ऑगस्ट बुधवार ला दुपारी साडे चार वाजताच्या दरम्यान, निखिल व त्याचा एक मित्र दोघेही दिपक चौपाटी जवळील एका कॅन्टीन वर चहा घेतला. त्यानंतर त्याचा मित्र हा दुचाकी वरुण निघून गेला. मात्र, निखिल दुचाकी सुरु करून निघतानाच तिथे दोन तरुण आले व त्यांनी सोबत आणलेल्या स्टील रॉड ने निखिलला मारण्यास सुरवात केली. त्याचवेळी आणखी तिघे जण तिथे आले त्यानंतर त्या चौघांनी मिळून आप च्या पदाधिकाऱ्यांना रॉडने बेदम मारहाण केली. मात्र या प्रकरणी तक्रार दखल घेत नसल्याने अखेर निखिल ढुरके यांना अमरावती पोलीस महानिरीक्षकांची भेट घेऊन आपबीती कथन करावी लागली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेचच फोन वणी स्टेशन ला धडकला आणि रात्री उशिरापर्यंत तक्रारीची हालचाल सुरु झाली व गुन्हा दाखल करण्यात आला. 

या प्रकरणी इजहार ग्यासुद्दीन शेख (45), असलम अब्बास पठाण (27), वसीम शेख (28), ताहीर शेख रफीख शेख (38), अल्ताफ चिरी (27), एक अनोळखी इसम (वय अंदाजे 50) अशा 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर भांदविच्या कलम 307, 326, 143, 147, 148, 149, 506, 109 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार 3 (2) (VA), 3 (2), 3 (V), 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम आदमी पार्टीचे ता.संयोजक निखिल ढुरके मारहाण प्रकरणातील आरोपीना अटक : 

या मारहाण प्रकरणातील 3 आरोपींना वणी पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले अस्लम अब्बास पठाण (27), वसीम शेख (28) व ताहीर शेख रफिक शेख (28) सर्व रा.वणी यांना वणी न्यायालयात हजर केले असता तिघांना 14 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सदर गुन्ह्यातील गैरअर्जदार इजहार ग्यासुद्दीन शेख मंगळवार 8 ऑगस्ट पासून कामानिमित्त परदेशात गेल्याची माहिती आहे. मारहाण करणाऱ्या 5 आरोपी पैकी तिघांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली असून दोघंजण फरार आहे.
आप'च्या पदाधिकाऱ्याला रॉडने बेदम मारहाण आप'च्या पदाधिकाऱ्याला रॉडने बेदम मारहाण Reviewed by सह्याद्री चौफेर on August 11, 2023 Rating: 5
Powered by Blogger.