सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील ग्रामपंचायतच्या निवडणूका पार पडल्या आणि सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी सत्ता हाती घेतली. त्यामुळे ग्रामस्थांना आपले गांव, वार्ड आता सुधारेल अशी आशा लागली आहे. मात्र,काही ग्रामपंचायतीचे निर्णायक कामे अजूनही वार्ड निहाय नागरिकांना दिसत नसल्याने आता गांव कारभाऱ्याना आठवण करून देत वनोजा येथील वार्ड क्र. 3 च्या रहिवाशियांनी ग्रामपंचायत सरपंचा यांना निवेदन सादर केले.
आज ग्रामसभेच्या अनुषंगाने येथील नागरिकांनी विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.यात नमूद केल्याप्रमाणे गावात नळ योजना आली. मात्र, नळ योजना व्यतिरिक्त बाकी घरकुल योजना, रस्ते, सांडपाणी विल्हेवाट, इतर सुविधाबाबत ग्रामपंचायतने कुठलाही निर्णय घेतला नसल्याने किंबहुना कधी निर्णय घेणार?...असा प्रश्न वार्ड क्रमांक 3 मधील रहिवाश्यांनी सरपंच यांचे समोर लेखी स्वरूपात मांडला. लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
निवडणूक पार पडली, आता स्थानिकांच्या अपेक्षा वाढल्याने येथील जनतेला सुविधा मिळाव्या म्हणून सरपंचांना निवेदन देण्यात आले. आमचा प्रश्न मार्गी लावावा, यासाठी वार्ड क्रमांक 3 मधील नागरीकांनी आग्रही साकडेही घातले आहे. जर ह्या शुल्लक मागण्या मान्य न झाल्यास, मारेगाव पंचायत समिती समोर लोककशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा गर्भीत ईशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनावर सतीश मिलमिले, रोशन शिंदे, विठ्ठल पिदूरकर, तारा रमजान शेख, युवराज गाताडे, मोहन देवाळकर, नागेश वालकोंडावार, सोपान ठाकरे, प्रतिभा महाकुलकार, नंदा आत्राम, देविदास पाटील, नसीमा शेख, गौरव नगराळे सह इतर नागरिकांच्या सह्या आहेत.
..
वार्ड क्रमांक 3 मधील समस्या, प्रश्न मार्गी लावा - वनोजा ग्रामस्थांची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 13, 2023
Rating:
