मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित समस्या सोडवाव्यात - अविनाश रोकडे जिल्हाध्यक्ष

सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख 

यवतमाळ : मुख्याध्यापक संघ यवतमाळ 
दि. 13 जुलै 2023 रोजी ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय अमरावती येथे आमदार श्री. धिरजभाऊ लिंगाडे विधानपरिषद सदस्य अमरावती पदवीधर मतदार संघ अमरावती. यांच्या उपस्थितीत शिक्षण उपसंचालक मा. डॉ.  शिवलिंगजी पटवे. पाचही जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, वेतनपथक अधीक्षक प्राथमिक, माध्यमिक सर्व लेखाधिकारी शिक्षण विभाग यांच्या उपस्थितीत संयुक्त सभा संपन्न झाली. सभेला अमरावती विभागातील विदर्भ मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी शिक्षण विभागातील भेडसावत असलेल्या समस्याबद्दल पाढा वाचला.

यावेळी यवतमाळ जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष अविनाश रोकडे यांनी मा. आमदारा समोर मला संघटनेत काम करताना 30 वर्षाचा अनुभव आहे. या अगोदर मा. शिक्षक आमदार, मा. पदवीधर आमदार यांच्या अनेक सभेला मी उपस्थित होतो. मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समस्या सुटत नाही. आपण मा. आमदार साहेब सभेमध्ये अधिकारी वर्गावर रागावतात. वेळ निघून जाते परंतु कर्मचारी यांच्या प्रलंबित समस्येचे निराकरण होत नाही ही वस्तुस्थिती आहे.

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यामध्ये 20 टक्के ,40 टक्के कर्मचाऱ्याची टप्पा वाढ थांबविल्या गेली. कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यतेमध्ये आवक, जावक क्रमांक नाही व इतर कारणासाठी त्यांना टप्पा वाढ देण्यात आली नाही. या करिता मा. आमदार साहेबांनी विधानपरिषदेच्या सभागृहात लक्षवेधी लावावी. या कर्मचाऱ्यांच्या जिवनाशी खेळू नका. फक्त ते जिवंत आहे का एवढेच पहावे. असे समजावून सांगितले.
शाळेतील सुट्टयांचे नियोजन करण्यासाठी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना फोन लाऊन बोलाविले जाते. आम्ही आपापसात भांडतो परंतु कार्यालयाचे नियोजन आधीच तयार असते. मग बोलावता कशाला? सुट्टयांचे नियोजनासाठी जसे संघटनेचे पदाधिकारी यांना बोलावता तर कर्मचाऱ्याची वैयक्तीक मान्यता, अतिरिक्‍त शिक्षकांचे समायोजन, कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मेडिकल व इतर महत्वाच्या कामासाठी संघटनेला जवळ सुद्धा करीत नाही ही खंत अविनाश रोकडे यांनी व्यक्त केली.

एका संवेदनशील विषयावर सभेमध्ये छेडले असता असा विषय सभेमध्ये काढायचा नाही यासाठी आपणाकडे प्रूफ काय आहे हे दाखवा. त्याशिवाय बोलू नका असे साहेबांनी बजावले. आपल्या सर्वांच्या भावना माझ्या पर्यंत पोहोचल्या. आपल्या समस्यांचे निराकरण केले जाईल असे मा. शिवलिंगजी पटवे शिक्षण उपसंचालक अमरावती यांनी सांगितले. यावेळी विदर्भ मुख्याध्यापक संघटनेचे सचिव सुरेंद्र कडू, ललित चौधरी जिल्हाध्यक्ष अमरावती, दिलीप कडू कार्याध्यक्ष, सुनिल जवंजाळ बुलढाणा, दिलीप कडू उपाध्यक्ष अकोला, दयालाल भोयर, संजय अतकरे, रामचंद्र खारकर, गजानन मानकर, प्रदीप नानोटे, अमरावती विभागातील मुख्याध्यापक संघटना, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित समस्या सोडवाव्यात - अविनाश रोकडे जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित समस्या सोडवाव्यात - अविनाश रोकडे जिल्हाध्यक्ष Reviewed by सह्याद्री चौफेर on July 16, 2023 Rating: 5
Powered by Blogger.