ग्रामीण रस्त्यांचे अच्छे दिन केव्हा येणार?

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : राज्यात ग्रामीण भागाचा विकास झाला आहे. मोठा गाजावाजा करीत भाजपाकडून दाखविण्यात येते. शासनाने विविध योजना राबविल्या परंतु, प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भाग विकासापासून कोसो दूर असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस येते.

तालुक्यातील देवी ते लाखापूर हे अंतर 3 किमी असुन गेल्या अनेक वर्षांपासून सदर रोड अखेरच्या घटका मोजत आहे. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याची मागणी स्थानिकांची असून या रस्त्याला अच्छे दिन कधी येणार? असे लाखापूर ते भांदेवाडा येथे जाणाऱ्या भाविक भक्तांकडून बोलल्या जात आहे. 

दर सोळा तारखेला विदर्भातून हजारो भाविक भांदेवाडा येथील जगन्नाथ बाबा तीर्थक्षेत्र यांच्या दर्शनाला येतात. मात्र, वणी नांदेपेरा मार्डी या राज्यमार्गांवरून देवी स्टॉप आहे. या देवी स्टॉप वरुन वर्धा, हिंगणघाट, माढेळी, राळेगाव, कळंब, बाभुळगाव या भागातील भाविक मोठ्या प्रमाणात लाखापूर वरुन भांदेवाडा जातात. आज रविवार सुट्टीचा दिवस, शिवाय जगन्नाथ माऊलींची "सोळा" तारीख. या मुळे हजारोभाविकासह चारचाकी वाहने या मार्गाने येरजाऱ्या करतात. पावसाळ्याचे दिवस त्यामुळे रस्त्याची अतिशय दयनीय दुरावस्था झाल्याने प्रवाशी सह स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रिकामे पायदळ चालणे मुश्किल कठीण झाले आहे, परिणामी चिखलमय झालेल्या रस्त्याने नागरिकाचे होणारे हाल थांबवावे अशी मागणी भाविकांकडून जोर धरत आहे.

मारेगाव तालुक्यातील देवी ते लाखापूर बऱ्याच वर्षापासून कच्चा रोड होता, ग्रामस्थांनी रोड डांबरीकरण व्हावा यासाठी लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे रोडचे डांबरीकरण होऊन रोड मध्ये सुधारणा करण्यात यावी मागणी करीत अखेर डांबरीकरण झाले. या गोष्टीला बराच कालावधी लोटून गेल्या नंतर, तूर्तास या देवी ते लाखापूर 3 किमी अंतराचा रस्ता पूर्णतः रखडून त्याची चाळण झाली असतांना संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष होत आहे. या मार्गांवर प्रवास करणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर किरकोळ अपघातही होत आहे. आजच एका दुचाकीस्वारा सह महिला भाविक या रस्त्यावर घसरून पडल्याची माहिती आहे.

आता पावसाचे दिवस सुरू झाल्याने सदर रोडची अत्यंत दयनीय दुरावस्था झाली असून गाडी तर, सोडा नागरिकांना रिकामे पायदळ चालणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे नागरिकातून प्रशासन व लोकप्रतिनिधी विषयी रोष व्यक्त होत असून देवी, लाखापूर ते भांदेवाडा रस्त्याची तात्काळ नव्याने दुरुस्ती करून द्यावे अशी मागणी प्रवाशी नागरिकांसह ग्रामस्थांमधून केली जात आहे.


ग्रामीण रस्त्यांचे अच्छे दिन केव्हा येणार? ग्रामीण रस्त्यांचे अच्छे दिन केव्हा येणार? Reviewed by सह्याद्री चौफेर on July 16, 2023 Rating: 5
Powered by Blogger.