प्रसिद्ध अभिनेता रवींद्र महाजनी यांची एक्झिट वेदनादायी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

'झुंज' या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपट सृष्टीतून कारकीर्द सुरू करणारे चतुरस्त्र अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपट व कला क्षेत्राची मोठी हानी झाली असून त्यांची एक्झिट अतिशय वेदनादायी आहे, 

रवींद्र महाजनी हे त्यांच्या देखण्या आणि भारदस्त व्यक्तीमत्वामुळे 1980 च्या दशकात 'चॉकलेट हिरो' म्हणून प्रसिद्ध होते. गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, देवता, दुनिया करी सलाम अशा चित्रपटातून त्यांनी साकारलेल्या अभिनयाच्या विविध छटा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. त्यांची देऊळबंद चित्रपटातील संत श्री गजानन महाराज यांची भूमिका छोटी पण लक्षात राहणारी आहे.

मराठी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने दमदार अभिनय असणारे रुबाबदार व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे,देखणे व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू अभिनयाच्या बळावर ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांनी मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या हृदयसिंहासनावर अनेक दशके अधिराज्य करणारा महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. रवींद्र महाजनी यांच्या अभिनयाने मराठी कलारसिकांच्या पिढ्यांना मनमुराद आनंद दिला. मराठी कलासृष्टी समृद्ध करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या निधनाने एक देखणा कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे.

रवींद्र महाजनी यांच्या निधनाने त्यांचा चाहता वर्ग, मराठी चित्रपट सृष्टी आणि त्यांचा परिवार सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या गुणवान अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण...
प्रसिद्ध अभिनेता रवींद्र महाजनी यांची एक्झिट वेदनादायी प्रसिद्ध अभिनेता रवींद्र महाजनी यांची एक्झिट वेदनादायी Reviewed by सह्याद्री चौफेर on July 17, 2023 Rating: 5
Powered by Blogger.