सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : महाराष्ट्राचे इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन या विभागाचे माजी कॅबिनेट मंत्री तथा काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार आज रविवार १६ जुलै ला दुपारी १२.३० वाजता मारेगाव येथे येणार आहे. ते मारेगाव येथील शेतकरी सुविधा केंद्र सभागृहात तालुका काँग्रेस कमेटीच्या वतीने आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्याला प्रत्यक्षपणे संबोधणार आहे.
तालुक्यात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्या सबंधी ते संवाद साधून त्याच्या कुटुंबियांना "विजय किरण फाउंडेशन" या स्वयंसेवी संघटनेमार्फत धनादेशाचे वितरण करणार आहे. आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी आ वामनराव कासावार, महाराष्ट्र पणन महासंघांचे संचालक नरेंद्र पा. ठाकरे, काँग्रेसचे जेष्ठ नेते नानाजी खंडाळकर, जिल्हाध्यक्षा महिला काँग्रेस कमिटीच्या सौ वंदनाताई आवारी, वणी वसंत जिनींगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
या मेळाव्यात पक्ष प्रवेश करणाऱ्यांना आ वडेट्टीवार सन्मानित करणार आहे. मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाची तालुका काँग्रेस कार्यकर्त्याकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना पक्षात कसा प्रवेश घेता येईल याबाबत नियोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी मोठ्या संख्येने उपविभागातील काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा जत्था आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित असणार असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते, तालुका काँग्रेस, महिला तालुका काँग्रेस, युवक काँग्रेस, सह इतर सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहे.
आजच्या कार्यकर्ता मेळाव्याला, माजी कॅबिनेट मंत्री आ.विजय वडेट्टीवार संबोधणार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 16, 2023
Rating:
