तरुणांनो सावधान! आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ व्हायरल, दगडफेक केली तर 'या' कलमांनुसार आयुष्यभर नोकरीची संधी मिळणार नाही...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

आजकाल सोशल मिडियाचाही वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. यातून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, व्हिडीओ शेअर करणे, व्हायरल करण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र अशा पोस्ट केल्याने आयुष्यभरासाठी नोकरीतून हात धुण्याची वेळ येऊ शकते.

शासकीय, खासगी नोकरीसाठी चारित्र्य प्रमाणपत्राची (character certificate) गरज असते. यासाठी गुन्हा दाखल नसला तरच नोकरी मिळते, मात्र एका आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओने तरुणांना कायमचे नोकरीतून हात धुण्याची वेळ येऊ शकते. तसेच दंगलीच्या काळात दगडफेक करणाऱ्यांना तर तुरुंगाची हवा खावी लागली आहे. जीवनात आलेल्या नोकरीच्या संधीवरही पाणी सोडावे लागले आहे. 

या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो

कलम ४२७ : जाळपोळ करणे, सार्वजिनक शांतता भंग करणाऱ्यांवर ४२७ कलमान्वये गुन्हा दाखल केला जातो.

कलम १८८ : सार्वजनिक ठिकाणी तोडफोड करणे, पोलीस, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम १८८ नुसार कारवाई केली जाते.

कलम १४४ : बेकायदेशीरपणे जमाव एकत्र करणे, कायद्याचे उल्लंघन करणे, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कलम १४४ अन्वये कारवाई करण्यात येते.

कलम १५३ : एखाद्या मुद्यावर भडक भाषण देणे, तापलेल्या प्रकरणाला आणखी तापविण्यासाठी भाषण करणाऱ्यांवर २५३ अन्वये गुन्हा दाखल होतो.

कलम ३५३ : शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्याविरोधात भारतीय दंड विधान कलम ३५३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येतो,

कलम १०९ : समाजात अपप्रेरणा, चिथावणी, भडकावणी, दंगलीला कारणीभूत ठरणाऱ्यांवर कलम १०९ अन्वये कारवाई करण्यात येते.


तरुणांनो सावधान! आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ व्हायरल, दगडफेक केली तर 'या' कलमांनुसार आयुष्यभर नोकरीची संधी मिळणार नाही... तरुणांनो सावधान! आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ व्हायरल, दगडफेक केली तर 'या' कलमांनुसार आयुष्यभर नोकरीची संधी मिळणार नाही... Reviewed by सह्याद्री चौफेर on July 15, 2023 Rating: 5
Powered by Blogger.