सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : शहरातील हायवे रोड वर एका कंट्रक्शनचे काम सुरु आहे. बाजूला धार्मिक स्थळ आहे असे असतांना मात्र, या ठिकाणी शहरातीलच एका ठिकाणचे देशी दारूचे दुकान या बांधकाम ठिकाणी स्थलांतरित करण्याचा घाट असल्याचे विरोधात वंचित बहुजन आघाडी व द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
शहरातील प्रभाग क्र.१२ मध्ये धम्म राजीका बुध्द विहार आहे. त्या परिसरात वर्षभर धार्मीक कार्यक्रम व संस्कार शिबीर सातत्याने राबविले जातात. विहार परिसरात धार्मीक कार्यक्रम सतत सुरु असतात व तेथे मोठ्या संख्येने उपासक-उपासिका, अबाल वृध्द, महिला यांची नेहमी वर्दळ यांची नेहमी वर्दळ असते.
त्यामुळे या परिसरात मद्य विक्रीच्या व्यवसायामुळे धार्मीक विटंबना वाढून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी या ठिकाणी मद्यविक्रीच्या व्यवसायास परवानगी देण्यात येवू नये. अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही देण्यात आला आहे.
सादर निवेदनावर वंचित आघाडी व भारतीय बौद्ध महासभाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीसह मारेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी, तहसीलदार, ठाणेदार, प्रभाग क्रमांक १२ चे नगरसेवक यांना देण्यात आले.
इथे मद्यविक्री व्यवसायाला परवानगी देवू नका - अन्यथा तीव्र आंदोलन छेडू
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 17, 2023
Rating:
