सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : आर. सी. सी. पी. एल (RCCPL) लिमिटेड या कपंनी अंतर्गत डोंगरगाव येथे सुरु करण्यात येणाऱ्या चुनखडी खान प्रकल्पाला डोंगरगाव वेगाव,परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवीला असून, आज होणाऱ्या जन सुनावणीवर येथील नागरिकांनी बहिष्कार टाकत तीव्र विरोध करून तसा ठराव पारित करण्यात आला.
तालुक्यातील वेगाव, डोंगरगाव, दहेगाव परिसरात खोदकाम करून येथील चुनखडी ही झरी तालुक्यातील मुकुटबन स्थित प्रकल्पाला पुरवठा करायचे ठरले आहे. त्यासाठी डोंगरगाव, दहेगाव, वेगाव परिसरातील २५२.३६ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. यात १० किमी परिघ क्षेत्रातील एकूण ५५ गावे, ८८०३१ कुटुंबे आणि ३६४३०६ एवढी लोकसंख्या या प्रकल्पात बाधित होणार आहे. या खान पट्ट्यातून दररोज अडीच ते तीन टन चुनखडीची वाहतूक करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात प्रदूषणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी डोंगरगाव, दहेगाव तसेच वेगाव परिसरातील जमिनी ह्या उजाड होणार असून, याचा परिणाम मुख्य पिंकावर होणार असल्याची भिती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. या चुनखडीच्या उत्खननामुळे परिसरामध्ये ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, रसायनाच्या अतिवापराने जलप्रदूषण मोठया प्रमाणावर होणार असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे.
या होऊ घातलेल्या प्रकल्पाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला असून आज झालेल्या जनसुनावणी दरम्यान गावातील प्रकल्प ग्रस्त बाधीतानी बहिष्कार टाकला आहे. या अनुषंगाने वाढीव मोबदला मागितला आहे. या जनसुनावणी दरम्यान, जमेची बाजू न दिसताच शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करित जनसुनावणी वर बहिष्कार टाकला आहे. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, तहसीलदार उत्तम निलावाड, ठाणेदार जनार्दन खंडेराव, हे प्रामुख्याने उपस्थित होते.
'त्या' जन सुनावणी वर गावाकऱ्यांचा धिक्कार..!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 17, 2023
Rating:
