सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : आता हे धान्य स्वच्छ झाले, खडे बाजूला गेले. विकास विकास वैगेरे काही नाही, त्यांना सत्ता पाहिजे होती ते सत्तेसाठी गेले. ज्यांना सेवा करायची होती ते सोबत आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते तथा माजी कॅबिनेट मंत्री आ विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले.
मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा येथील शेतकरी सुविधा केंद्रात आयोजित करण्यात आला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस नेते माजी आ. वामनराव कासावार होते तर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून आ. विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र पणन महा संघांचे संचालक नरेंद्र पा. ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराणा, विजय किरण फाउंडेशनच्या शिवानी वडेट्टीवार, डॉ.महेंद्र लोढा, आशिष खुलसंगे, इजहार शेख, राकेश खुराणा, राजीव कासावार प्रामुख्याने उपस्थित होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की, लोकं ठरवतात. आजच्या राजकारणामध्ये लोकांच्या भावना ह्या विकासासाठी, सेवेसाठी जुळल्या असतात. सत्तेसाठी निष्ठा, विचार गहाण ठेवणाऱ्यांना जनता कधी साथ देत नाही. या मेळाव्याला मंचकावर उपस्थित मान्यवरांनी आपापले विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात वामनराव कासावार यांनी सरकार वर ताशेरे ओढत हे महागाई, बेरोजगारी देणाऱ्या मोदी सरकार खोटारडे आश्वासन देत असल्याचे खरपूस समाचार घेतला.
तालुक्यातील शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबियांना मदतीचा हात म्हणून विजय किरण फाउंडेशनच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आले. तर, आज पर्यंत ज्यांनी पक्षासोबत राहून निष्ठा जपली व प्रामाणिकपणे कामे केली त्यापैकी अनेकांची काँग्रेस कमिटीच्या विशिष्टपदी नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला आहे. या प्रसंगी मतदार संघातून काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा पाहायला मिळाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमण डोये, तुळशीराम कुमरे, प्रफुल विखणकर, अरविंद वखानोर, आकाश बदकी, शंकरराव मडावी, सैय्यद समीर, रवी पोटे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांनी केले तर सूत्रसंचालन साहिल दरणे यांनी केले. उपस्थितांचे आभार अंकुश माफूर यांनी मानले.
आता हे धान्य स्वच्छ झाले, खडे बाजूला गेले - आ. वडेट्टीवार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 18, 2023
Rating:
