यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : अवैध साठ्यावर धाड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : पांढरकवडा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या करंजी येथे शासकीय धान्याची अवैधरीत्या वाहतुक करणारे वाहन व अवैधरीत्या देशी दारूचा साठा विक्री करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळच्या पथकाने केली असून एकुण 9,41,300 रुपयाचा मुददेमाल जप्त केली.

सूत्राच्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी जिल्हयात सुरु असलेल्या अवैध धदयांची गोपनिय माहीती काढुन प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सूचना दिल्या होत्या,तेव्हा दिनांक १६/०७/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि अमोल मुडे व त्यांचे पथक पांढरकवडा उपविभागात अवैध धंदयाची उधळून लावण्याच्या अनुषंगाने  पेट्रोलिंग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, पांढरकवडा येथुन करंजी मार्गे राष्ट्रीय महामार्गाने TATA 407 कंपनीचा मालवाहू गाडी क्रमांक एम.एच.20 डि ई 2434 या वाहनाने स्वस्त धान्य दुकानात शासनातर्फे पुरवठा करण्यात येणारे तांदुळ पांढऱ्या व पिवळया कट्ट्यामध्ये भरून विक्री करीता अवैधरीत्या हिंगणघाट कडे घेवून जाणार आहे. अशी गोपनीय माहीतीच्या आधारे सकाळी 10.30 वाजताचे दरम्यान ग्रामीण रुग्णालय करंजी जवळील पुलाजवळ सापळा लावून पांढरकवडा वरुन येणारे मालवाहू वाहन क्रमांक एम.एच. 20 डि ई 2434 हे थांबविले असता वाहनात चालक व त्याचे सोबत एक इसम बसलेले दिसले त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता वाहन चालक याने त्याचे नाव सुनिल सूर्यभान वड (वय ४५) रा. कोधारा ता. केळापुर व सोबतच्या इसमाने त्याचे नाव मोरेश्वर अन्नाजी डेहणकर (वय 56) रा. शास्त्री नगर पांढरकवडा असे सांगीतले. त्यांना गाडीमध्ये काय आहे असे विचारले असता त्यांनी अंदाजे 80 पोत्यामध्ये 03 क्विटल तांदुळ असल्याचे सांगीतले. गाडीचे पाहणी केली असता त्यात प्लास्टीकचे पांढऱ्या व पिवळया रंगाचे पोत्यामध्ये तांदुळ भरलेला दिसला. दोन्ही इसमांना तांदुळ साठयाचे कागदपत्र व तांदुळ कोठुन आणला व कोठे नेणार आहे याबाबत विचारपुस केली असता त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तरे न दिल्याने सदरचा साठा हा शासकीय धाण्यांचा असू शकतो असा  संशय निर्माण झाल्याने सदरचा तांदूळ साठा अंदाजे 03 क्विटल किंमत 1,00,000 रूपये व मालवाहू वाहन किंमत 3,00,000 रुपये असा एकूण 4,00,000 रुपयाचा मुददेमाल पो.स्टे.ला डिटेन करण्यात आला व पुढील कायदेशीर कारवाई करीता मा. तहसिलदार साहेब पांढरकवडा यांना पत्र देण्यात आले आहे. त्यानंतर करंजी गावातच सदर कारवाई करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली की, करंजी गावात वार्ड क्रमांक 02 येथे राहणारा इसम नामे गर्जन खेरे हा त्याचे घरात व घरासमोरील सिल्वर रंगाचे S-Cross वाहन क्रमांक एम एच 40 ए आर 3802 यामध्ये देशी दारुचा अवैध साठा विक्री करण्याचे उददेशाने बाळगुन आहे. अशी खात्रीलायक गुप्त माहितीच्या आधारे 12.30 वाजता चे दरम्यान, गर्जन खरे इसमाच्या घराकडे जात असता गर्जन खेरे हा दुरुनच पोलीसांना बघताच गल्लीबोळाचा फायदा घेवुन पोबारा केला.

माहीतीप्रमाणे त्याचे राहते घराची झडती घेतली असता त्याचे घरात देशी दारु रुपेश संत्राच्या 180 एमएल च्या एकुण 344 नग बॉटल किंमत 24.080/- रुपये व त्याचे घरासमोरील वाहन क्रमांक एम एच 40 ए आर 3802 यात देशी दारुच्या 180 एमएलच्या 96 नग बॉटलव 90 एमएलच्या 300 नग बॉटल असा एकुण किमत 11.220/- रुपये व चारचाकी वाहन किंमत 5,00,000/- रुपये असा एकुण 5,41,300 रुपयाचा मुददेमाल जप्त करुन पोस्टे पांढरकवडा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही डॉ. श्री. पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, श्री. पियुष जगताप, अपर पोलीस अधिक्षक, यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक, स्वा.गु.शा. यवतमाळ, सपोनि अमोल मुडे, पोलीस अमलदार योगेश डगवार, सुनिल खंडागळे, प्रशांत हेडाऊ, सुधीर पांडे, निलेश निमकर, भोजराज करपते, सुधीर पिदुरकर, रजनिकांत मडावी, चापांना सतीश फुके सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांनी यशस्विरित्या पार पाडली आहे.
यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : अवैध साठ्यावर धाड यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : अवैध साठ्यावर धाड Reviewed by सह्याद्री चौफेर on July 17, 2023 Rating: 5
Powered by Blogger.