सह्याद्री चौफेर | कालू रामपुरे
वरोरा : तालुक्यात महाडोळी ते महाडोळी पाटी, चिकणी ते शेगाव पाटी या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे, गेल्या तिन वर्षापासून या रस्त्याने प्रवास करणे कठीन झाले असून जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दयनिय अवस्था झालेली असून नियुक्त लोकप्रतिनीधी आणी शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे कधी दुर्घटना घडत असून प्रवास करणारे नागरीकांना कधी आपला जीव गमवावा लागेल काही नेम नाही.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेना (उबाठा) महीला आघाडी जिल्हा संघटीका नर्मदा बोरेकर व वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात तालुका प्रमुख दत्ता बोरेकर यांच्या नेतृत्वात आज उपविभागीय अभियंता, बांधकाम विभाग, पंचायत समिती वरोरा यांना महाडोळी ते महाडोळी पाटी, चिकणी ते शेगाव पाटी, नागरी माढेली, उखर्डा ते नागरी, गिरसावडी ते माढेडी, गौड शेगाव या चारही रस्त्याबाबत दुरस्ती करून डांबरीकरण करण्यात याकरीता निवेदन देण्यात आले.
माडोळी ते माडोळी पपाटी रस्ता 50 लाख मंजूर, उखर्डा ते नागरी रस्ता दुरुस्ती 80 लाख मंजूर आहे असे उपविभागीय अभियंताझाडे यांनी कळविले. परंतु कामे मंजुरी असताना सुद्धा खूप विलंब होत असल्या कारणाने नागरिक त्रस्त झालेले आहे तरी मंजूर काम ताबडतोब सुरू करण्याची मागणी दत्ता बोरेकरच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने आपल्या निवेदनाद्वारे केली.
चिकणी ते शेगाव पाटी दुरुस्ती एक कोटी २० लाख रुपयाची मागणी असून वरिष्ठ अधिकारी या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे तसेच गिरसावडी ते माढेली, गौड ते शेगाव अत्यंत खराब रस्ता झाला असून संबंधित विभागाचे दुर्लक्ष असून, विभागाने या परिसरातील जनतेची ज्वलंत मागणीची दखल घेत तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून मार्गी लावावी अन्यथा शिवसेनेचे जन आंदोलन आक्रमकपणे सुरू होईल असा ईशारा शिवसेना तालुकाप्रमुख दत्ताभाऊ बोरेकर यांनी दिला.
याप्रसंगी निवेदन देतांना पदाधिकारी सोबतच शिवसेना महिला जिल्हा संघटिका नर्मदा बोरेकर, युवती जिल्हाप्रमुख तथा सरपंच महाडोली प्रतिभा मांडवकर, महिला तालुका संघटिका सरला मालोकर, अभिजीत कुडे, निखिल मांडवकर, दादापुर सरपंच विद्या खाडे तथा असंख्य महिला पुरुष शिवसैनिक उपस्थित होते.
ग्रामिण क्षेत्रातील मंजूर रस्त्याची कामे तातडीने पुर्ण करावे - नर्मदा बोरेकर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 18, 2023
Rating:
