वणी शहरात लावलेल्या जलशुध्दिकरण संयंत्राची नियमीत तपासणी करा


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : आज लेखी निवेदनाव्दारे वणी शहरातील नागरिकांना मागील खुप दिवसापासून पिण्याचे शुध्द पाणी मिळत नाही. अशा प्रकारच्या तक्रारी आपल्यापर्यंत जनतेच्या माध्यमातून आलेल्या आहे. तरीही आपल्या माध्यमातून यावर कुठलेही कायम स्वरूपी उपाय योजना करण्यात आलेलो नाही तरी वणी शहरातील नागरीकांना शुध्द पाणी पिण्यासाठी शहराच्या ठिकठिकाणी सयंत्र (वॉटर फिल्टर) बसविण्यात आले पाण्याच्या टाकीजवळ प्रगती नगर येथे उभारण्यात आलेल्या जलशुध्दीकरण संयंत्रात शुद्ध पाण्याचा दुर्गंधीयुक्त वास येत आहे. नुकताच पावसाळा सुरु झाला सर्वात जास्त रोगराई ही पावसाळयात पिण्याच्या पाण्याच्या माध्यमातून होत असते व त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे वणी शहरातील लावलेल्या वॉटर फिल्टरला नियमीत देखभाल दुरूस्ती कुठल्या कंत्राटदाराकडे आहे व त्यान्द्वारे होणारी तपासणी कशा पध्दतीने होते याचे प्रात्यक्षिक अहवाल येत्या सात दिवसात आम्हाला देण्यात यावा. अन्यथा आपल्या प्रशासनाच्या विरोधात आम्हाला जनआंदोनल उभारावे लागेल याची दखल आपण घ्यावी. हयावेळी प्रवीण खानझोडे, अजय धोबे, विकेश पानघाटे, रुपेश ठाकरे, ललित लांजेवार, राहुल झट्टे उपस्थित होते.
वणी शहरात लावलेल्या जलशुध्दिकरण संयंत्राची नियमीत तपासणी करा वणी शहरात लावलेल्या जलशुध्दिकरण संयंत्राची नियमीत तपासणी करा Reviewed by सह्याद्री चौफेर on July 18, 2023 Rating: 5
Powered by Blogger.