शेतकऱ्यांना फसवणूकची तक्रार करण्यासाठी कृषी विभागातर्फे व्हाट्सॲप क्रमांक जारी..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पावसाळा असल्यामुळे शेतकऱ्यांची पीक लागवड करण्याची लगबग सुरु आहे. काही ठिकाणी मुबलक प्रमाणात पाऊस पडल्याने शेती कामांना वेग आला आहे. अशातच शेतकऱ्यांची बियाणे, कीटकनाशके, खतांमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असते. याच फसवणुकीच्या पार्शवभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक जारी केला आहे. शेतकऱ्यांना पेरणी दरम्यान काही अडचणी आल्यास व्हाट्सॲप संदेशाद्वारे आपली तक्रार नोंदवता येणार आहे. 
तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी कृषी विभागाने कार्यान्वित केलेला अधिकृत व्हाट्सॲप नंबर 9822446655 हा आहे. शेतकऱ्यांनी या नंबरवर व्हाट्सॲप संदेशाद्वारे आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.
याशिवाय शेतकरी मित्र 8446117500, 8446221750 किंवा 8446331759 या मोबाईल नंबरवर देखील संपर्क साधू शकता. 

याशिवाय कृषीविषयक योजनांच्या माहितीसाठी 18002334000 हा कृषी विभागाचा हेल्पलाईन क्रमांक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनांची माहिती हवी असल्यास या नंबरवर संपर्क साधायचा आहे. शेतकऱ्यांची तक्रार निवारण्यासाठी कृषी आयुक्तालयाकडून निवारण कक्ष देखील सुरु केला आहे. हा कक्ष 24 X7 कार्यरत असणार आहे. 
तसेच शेतकरी आपली तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या इमेल पत्त्यावर देखील करु शकतात. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे तक्रार करणाऱ्या व्यक्तींची नावे गोपनीय ठेवण्यात येणार आहे.


शेतकऱ्यांना फसवणूकची तक्रार करण्यासाठी कृषी विभागातर्फे व्हाट्सॲप क्रमांक जारी..! शेतकऱ्यांना फसवणूकची तक्रार करण्यासाठी कृषी विभागातर्फे व्हाट्सॲप क्रमांक जारी..! Reviewed by सह्याद्री चौफेर on July 26, 2023 Rating: 5
Powered by Blogger.