सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
आज दुपारीपासून मोठा पाऊस पडला, साडे पाच ते सहा वाजेच्या सुमारास अचानक आवाज झाला आणि थोड्याच वेळात शहरातील मुख्य मार्गांवरील अगदी तहसील, न्यायालय समोरील पेट्रोल पंपाच्या जवळच लागून असलेल्या झाडावर वीज पडली. दरम्यान, मोठा आवाज झाल्याने पेट्रोल पंपा वरील ग्राहक कामगार घाबरून गेले.
भारत पेट्रोलियम पंपा वर ग्राहक व काम करणारे कर्मचारी आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे निवांत जमले होते, पाऊस सुरु असल्यामुळे नागरिकांना बाहेर पडता सुद्धा येत नव्हते, अचानक येथील पेट्रोल पंपाच्या संरक्षण भिंतीला लागूनच असलेल्या झाडावर वीज कोसळली. पेट्रोल पंप च्या लगत असलेले जनरेटरने पेट घेतल्यामुळे सर्व घाबरून गेले व काही काळ तारांबळ उडल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान,प्रत्यक्षदर्शी वीज झाडावर पडल्याचे खुणावून सांगत होते.यात पेट्रोल पंप चालकाचे मोठे नुकसान झाले,सुदैवाने जीवितहानी टळली.
अचानक आवाज झाला आणि वीज कोसळली
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 26, 2023
Rating:
