शेतकरी बांधवानो आज होणाऱ्या पीएम किसान संमेलनात सहभागी व्हा - आत्मा समितीचे अध्यक्ष प्रसाद ढवस यांचे आवाहन
सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : अमृतकाळात देशातील गावे, देशाच्या शेतकऱ्यांच्या सामर्थ्यात वाढ करण्यासाठी आता देशाच्या सहकार क्षेत्राची भूमिका खूप मोठी ठरणार आहे. सरकार आणि सहकार एकत्रित होऊन, विकसित भारत, आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला दुप्पट मजबुती देतील. याच अनुषंगाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पीएम 'किसान संमेलन' हा महासोहळा सीकर राज्यस्थान येथे आज दि.27 जुलै 2023 रोजी संपन्न होत आहे. या संमेलनाला तालुक्यातील शेतकरी बांधवांना सहभागी होण्याचं आवाहन आत्मा समितीचे अध्यक्ष प्रसाद ढवस यांनी केले आहे.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 2019 आली शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य मिळावे, या उद्दात हेतूने सुरु करण्यात आलेल्या "पीएम किसान" योजनेच्या 14 व्या हप्त्याचे एका क्लिक वर थेट बँक खात्यावर वितरण व प्रधानमंत्री देशातील तमाम शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. सरकार ने डिजिटल इंडियाद्वारे पारदर्शकतेत वाढ केली, थेट लाभ प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवला. आज देशातील गरीबातील गरीब व्यक्तीला देखील याची जाणीव झाली असताना, सर्वसामान्य लोक, आपले शेतकरी, आपले पशुपालक यांना दैनंदिन जीवनात देखील याचा अनुभव मिळणे आणि त्यांनी देखील हे सांगणे अतिशय गरजेचे आहे.
आज डिजिटल व्यवहारांसाठी जगात भारताची ओळख निर्माण झाली आहे. शासनाच्या विविध योजनेचे लाभ थेट खात्यात वितरण होत आहे. यापुढेही काम जलदगतीने करण्याचा केंद्र सरकार चा मानस आहे. त्यामुळे या आयोजित समारंभास सहभागी होऊन या महासोहळ्याचे साक्षीदार व्हा, हा सोहळा ऑनलाईन वेब लिंक द्वारे पाहता येणार आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे शेतकरी धोरणाचे काय ते समजून घेता येणार आहे. त्यासाठी आज सकाळी 11 वाजता
https://pmevents.ncog.gov.in/या दिलेल्या वेबलिंक वर जॉईन व्हावे असे आवाहन आत्मा समिती मारेगावच्या वतीने करण्यात येत आहे.
शेतकरी बांधवानो आज होणाऱ्या पीएम किसान संमेलनात सहभागी व्हा - आत्मा समितीचे अध्यक्ष प्रसाद ढवस यांचे आवाहन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 26, 2023
Rating:
