सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : मणिपूरमध्ये गेल्या दोन अडीच महिन्यापासून महिलांवर अत्याचार करून त्यांना जीवानीशी ठार मारल्याच्या घटना घडत आहे. प्रचंड हिंसाचार सुरू आहे. शेकडो लोकांचे मृत्यू झाले आहे. हजारो लोक बेघर आहे. लहान मुलामुलींचे अतोनात हाल सुरू आहे. त्यामुळे या कलंकित घटनेचा वंचित बहुजन आघाडी तीव्र शब्दात निषेध करत असून घटनेतील गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
जमाव जेव्हा एखाद्या महिलेला रस्त्यावर निर्वस्त्र करतो आणि जाहीरपणे त्या महिलांची धिंड काढतो तेव्हा आमचा प्रधानमंत्री त्यावर काहीही बोलत नाही, मणिपूर सरकार व केंद्र सरकार हा अत्याचार रोखण्यास अपयशी ठरत असल्यामुळे मणिपूर सरकार बरखास्त करून येथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी वंचित मागणी आहे.
देशात असे निर्लज वर्तणूक करणाऱ्यावर कडक कायदे कारवाई फाशीची शिक्षा झाली पाहिजे तरच अशा प्रकारच्या कृत्याला आळा बसेल अन्यथा अशा प्रकारचे मुकदर्षकपणे पाहत रह्ययचे. हे आपल्या सुसंस्कृत देशाला लाजिरवाणे आहे. तात्काळ बंदोबस्त करून तेथील नागरिकांना संरक्षण देण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा गर्भीत ईशारा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निवेदनातून सरकार ला दिला आहे.
तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पाथरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली सोबतच मिरज येथे कमानी निमित्त झालेल्या त्या घटने संदर्भात तात्काळ कारवाई व्हावी यासाठी वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा च्या वतीने तहसीलदार यांचे मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना करण्यात आली आहे.
निवेदन देताना वंचित चे तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे, प्रफुल आदे, संजय जिवने,ता.उपाध्यक्ष, प्रफुल भगत, भगवान इंगळे, अनंता खाडे, रविंद्र तेलंग, विनय गजभिये, लक्ष्मीकांत तेलंग, रमेश चिकाटे, गौतम मालखेडे, विजय खाडे, नूतनताई तेलंग, सपनाताई वनकर, सुधाकर भगत आदीसह विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कलंकित घटनेतील गुन्हेगारांना फाशी देण्यात यावी- वंचित बहुजन आघाडीची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 27, 2023
Rating:
