सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
भिमेश फुलझेले लाइनमन अत्यंत कुशल, विजेच्या कामात, असो की वारा वादळानंतर उद्भवल्यास वीज पुरवठा ते प्रामाणिकपणे पूर्ववत करतात. रात्री बेरात्री विद्युत पुरवठा कुठेही खंडीत, प्रॉब्लेम आल्यास,सुरळीत करण्यासाठी धावून येतात, ट्रान्सफॉर्मर, मीटर, मीटरिंग उपकरणे, स्थापना, बांधकाम, देखभाल आणि दुरुस्ती ऐका हाकेवर तातडीने कर्तव्य पार पडतात. शिवाय फुलझेले हे मनमिळाऊ स्वभावाचे ते म्हैसदोडका परिसरात सुपरिचित आहे. त्यामुळे ग्रामस्थांची त्यांच्या सोबत एक आपुलकीची भावना जुळली आहे, असा लाईनमन पुन्हा आम्हांला मिळणे नाही,असे उपस्थित नागरिकांनी यावेळी 'सह्याद्री चौफेर'ला बोलतांना सांगितले.
मौजे म्हैसदोडका येथील लाईनमन यांची बदली झाल्यामुळे ग्रामस्थ भावुक झाले, आम्हाला हेच लाईनमन हवे म्हणून त्यांनी आज मा सहा. अभियंता शैलेंद्रकुमार पाटील, म.रा.वि.वि.कं.मारेगाव यांना निवेदनातून साकडे घातले आहे. फुलझेले यांनी सोज्वळ पद्धतीने परिसरातील अनेक नागरिकात आपुलकीचे संबंध दृढ केले. आपल्या कर्तव्यात कसूर न करता सामाजिक बांधिलकी जपत अनेकांना आपलंसं करून आपले कर्तव्य पार पडतात.त्यांच्या कामांना कधीच विसरता येणार नाही. त्यांची ही स्थानांतरण (बदली) त्वरित रद्द करून भिमेश फुलझेले यांनाच म्हैसदोडका येथे कायम द्यावे अशी आग्रही आर्तहाक निवेदनातून करण्यात आली आहे.
बालु पारखी, निलेशपारखी, नरेश तुराणकर, रामचंद्र जरिले,
मारोती वांढरे, विजय घागी, गणेश वांढरे, शुभम हेपट,
छत्रपती सोनेकार, वामन मटाले, खुशाल पारखी यांचे सह असंख्य गावकरी उपस्थित होते.
आमच्या कर्मचाऱ्यावर अशी प्रेम करणारे ग्रामस्थ बघितले, आभार, छान वाटलं..मी आपणास या बदलीबाबत काही बोलू शकणार नाही. वरिष्ठ काय निर्णय घेतात ते त्यांच्या अधिकारात असून मी आपण सर्वांची मागणी वरिष्ठाकडे मांडतो.-शैलेंद्रकुमार पाटीलसहा. अभियंता विद्युत वितरण कंपनी, मारेगाव
असा लाईनमन परत मिळणे नाही; अभियंतांना ग्रामस्थांनी घातले साकडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 27, 2023
Rating:
