सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
गेले दोन महिने मणिपूर जळत आहे. हिंसक हल्ले होत आहेत. दीडशेपेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. या दंगलीमध्ये आदिवासी व महिलांवर अत्याचार केले जात आहेत. त्यामुळे मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना सत्तेवर राहण्याचा एक क्षणभरही अधिकार नाही. त्यांचा ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांना बरखास्त केले पाहिजे तसेच पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना ह्या दंगली, महिलावरील अत्याचार, आटोक्यात आणण्यात अपयश आल्याने गृहमंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, गौरीशंकर खुराणा यांनी तहसीलदार यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केली आहे.
या निवेदनावर मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, सभापती गौरीखुराणा, प्रफुल विखणकर, संतोष मडावी, विजय घोरपडे, शालिक नेहारे, सय्यद समीर, युवक काँग्रेस अध्यक्ष, नयन आसूटकर, माया गाडगे महिला ता. अध्यक्ष, माया पेंदोर, शांता निझाडे, साधना खापणे, गुलाब बरडे, सोनू टेकाम, तुषार पवार, शकुंतला वैद्य, आदींच्या स्वाक्षर्या आहेत. यावेळी तालुक्यातील असंख्य काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते तथा नागरिक उपस्थित होते.
मणिपूर सरकार बरखास्त करा - तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 28, 2023
Rating:
