सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील शिरपूर, लालगुडा, व वणी शहरातील अनेक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात गरजुंना छत्री वाटप व वृक्षारोपण करून महाराष्ट्राचे माजी कुटुंब प्रमुख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम शहरातील साई मंदिर चौकातील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिरपूर येथील आरोग्य केंद्रात छत्री वाटप व वृक्षारोपण केले. त्यानंतर व श्री गुरुदेव माध्यमिक विद्यालयात, पोलिस स्टेशन शिरपूर, महावितरण कार्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. लालगुडा येथेही गरजुंना छत्री वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जेष्ठ पत्रकार जब्बार चिनी व परशुराम पोटे, रमेश तांबे यांच्या हस्ते गरजुंना छत्री वाटप, साई मंदिर चौकात गोरगरीब गरजुंना छत्री वाटप करण्यात आले. अशा प्रकारे सामाजिक उपक्रम राबवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी राजु वाघमारे, अविनाश भुजबळ, सचिन भोयर, लक्ष्मण डावरे, सतिश प्रफुल बोरडे, मयूर नागपुरे, सचिन करमळर, नयन कैराती, शत्रुघ्न मालेकर, राकेश मालेकर, चेतन उलमाले, निलेश ठमके, युवराज नागपुरे, प्रवीण गिरोले, यश बोबडे, राहुल सूर्यवंशी, ललित पोतराजे, मारुती गिरोले, दिपक मत्ते, शंकरजी गुरनुले, प्रवीण खोबरे, श्रीकांत वाढई, किशोर ठाकरे, कुणाल डोंगरकर, गोपाल वाढई, महादेव ठमके, अविनाश कोंगरे आदीची उपस्थिती होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमातून साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 28, 2023
Rating:
