सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : मणिपूर मध्ये दोन बघिंनीची निर्वस्त्र करून रस्त्यांवर घुमविणाऱ्या समाज कंटकाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आज (ता.25 जुलै) रोजी येथील मार्डी चौकात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे त्या निंदनीय घटनेचा तीव्र निषेध करून मणिपूर व केंद्र सरकार विरुद्ध जोरदार निदर्शने करण्यात आली. आपल्या घरातही आई-बहिनी आहे याची झुंडीला अजिबातही जाणीव नसते. त्यामुळे झुंडीतील समाजकंटक ही कोणाच्याही अब्रूची लक्तरे वेशीवर टांगू शकते. कोणालाही रस्त्यावर उघडे करून जाहीरपणे त्याच्या शरीराशी चाळे करू शकते. आमच्या अवतीभवती वावरणाऱ्या आमच्याच भगिनीला सर्वासमक्ष नागडे करून रस्त्यावर फिरवताना समाजकंटकाला कशाचीही भीती राहिली नाही. देशात कायदे जिवंत आहे की नाही हे दृश्य जनता बघत आहे.
मणिपूरमध्ये दोन भगिनींची रस्त्यावर निर्वस्त्र करून झुंडीने काढलेली धिंड देशाला तालिबानी संस्कृतीकडे नेणारी आहे. अडीच महिन्यापासून मणिपूरमध्ये प्रचंड हिंसाचार सुरू आहे. शेकडो लोकांचे मृत्यू झाले आहे. हजारो लोक बेघर आहे. लहान मुलामुलींचे अतोनात हाल सुरू आहे. असे असताना या देशाचे प्रधानमंत्री एक शब्द सुद्धा बोलत नाही. युरोपियन संसदेमध्ये मणिपूरच्या हिंसाचारावर चर्चा होते. परंतु देशाच्या संसदेमध्ये मात्र चर्चा करण्यास मनाई असते. त्यामुळे भारत सध्या कोणत्या दिशेने वाटचाल करीत आहे हे सांगण्याची गरज नाही. जमाव जेव्हा एखाद्या महिलेला रस्त्यावर निर्वस्त्र करतो आणि जाहीरपणे त्या महिलांची धिंड काढतो तेव्हा आमचा समाज कोणत्या विषाणूंनी भरलेला आहे हे लक्षात येते. आपल्या देशात कोणावरही संशय व्यक्त करून त्याच्या घरावर हल्ला करू शकते. असे निर्लज वर्तणूक करणाऱ्यावर कडक कायदे कारवाई फाशीची शिक्षा झाली पाहिजे तरच अशा प्रकारच्या कृत्याला आळा बसेल अन्यथा अशा प्रकारचे मुकदर्षकपणे पाहत रह्ययचे.
या मनोविकारी समाजकंटकाला स्वतःचे आचार विचार काही नसतात राक्षशी प्रवृत्तीचा बनला असते. हा समूह, क्रूर असते, निष्ठुर असते, निर्लज्ज असते आणि निगरगट्टही असते. या स्फोटक समुहाला मन,माया,ममता अजिबात नसते. हा घटक समूह फक्त आपल्या मालकाचा जयजयकार, उदोउदो करीत असते. या सरकारला निवडून देऊन जनतेला पश्चाताप होऊन राहिला. हे घातक, भयानक, धर्मांध विषाणू जर आमच्या घरात येऊ द्यायचे नसतील तर आम्हाला प्रत्येकाने या घटनेच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. प्रत्येक जागृत नागरिकाने अशा घृणास्पद कृत्याविषयी न घाबरता बोलले पाहिजे.तरच आम्ही आमच्या देशावर प्रेम करतो असे आम्हाला अभिमानाने सांगता येईल.अन्यथा आम्ही सुद्धा त्या समूहाचा एक भाग आहोत आणि आमच्याही भावना,वेदना,संवेदना मरण पावलेल्या आहेत या घटनेचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटा तर्फे मार्डी चौकात मणिपूर सरकार व केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात नारे निदर्शने करून तीव्र निषेध करण्यात आला व तहसीलदार यांना निवेदन देऊन नराधमांना फाशी ची देण्याची मागणी केली.
उपस्थित तालुका प्रमुख संजयभाऊ आवारी, सुनीलभाऊ गेडाम संघटक, नगरसेवक जितेंद्रभाऊ नगराळे, डॉ मनिष मस्की, युवासेना प्रमुख मयूर ठाकरे, राजूभाऊ मोरे, संजयभाऊ जिवने, सोमेश्वरभाऊ गेडेकार, विजयभाऊ अवताडे, पंकज नेहारे, मालाताई बदकी, नगरसेविका, दुमदेव बेलेकर, सुरेश पारखी, प्रसाद चौधरी, मुकुंदा निवल, संचालक कृ.बा.स.जीवन काळे, ब्रम्हदेव जुनगरी, मनोज वादाफळे, वर्षाताई किंगरे नगरसेविका, बळीराम भाऊ आदीं सह
सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मणिपूर मध्ये दोन बगिनींची निर्वस्त्र करून धिंड काढणाऱ्या नराधमांना फाशी द्या - शिवसेना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 26, 2023
Rating:
