मणिपुरमध्ये अत्याचार घडवून आणणाऱ्या सर्व गुन्हेगारांना अटक करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी


सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : मणिपुर येथे आदिवासी स्त्रियांवर बलात्कार करून नग्न धिंड काढण्यात आली व त्यांच्या अब्रुची लक्तरे अक्षरश: वेशीवर टांगून देशाची मान शरमेने खाली झुकवण्यात आली. देशाला या कलंकित करणाऱ्या घटनेविरुद्ध वणी येथील आदिवासी सामाजिक एकता संघटनेने मा.उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत मा.महामहिम राष्ट्रपती तसेच मा.ना.केंद्रीय कायदामंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांना एक निवेदन देण्यात आले. मणिपुरमध्ये आदिवासी महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर व त्यांवर सामुहिक बलत्कार करून त्यांचा खून करणाऱ्या सर्व आरोपींना त्वरित अटक करुन त्यांना फाशिची शिक्षा करण्यात यावी अशी जोरदार मागणी करून तीव्र शब्दात निषेध केला आहे.
मा. उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन देतांना आदिवासी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष मा.रमेशजी मडावी, मा.गीत घोष, मा.रामदासजी गेडाम, मा. उत्तमरावजी गेडाम, मा.पुष्पाताईआत्राम, धनराज मेश्राम, भाऊराव आत्राम, श्रीकृष्ण मडावी, गजानन बदखल, अंकीत देठे, स्वप्नील मंदे, ऋषी चांदेकर, सतीश गेडाम, सौ.रीना जुमनाके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मणिपुरमध्ये अत्याचार घडवून आणणाऱ्या सर्व गुन्हेगारांना अटक करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मणिपुरमध्ये अत्याचार घडवून आणणाऱ्या सर्व गुन्हेगारांना अटक करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on July 25, 2023 Rating: 5
Powered by Blogger.